शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करणार

By admin | Updated: April 12, 2015 00:57 IST

चंद्रकांतदादांची घोषणा : मुंबईत आॅगस्टपासून विनाटोल प्रवेश

मुंबई : मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या चारचाकी वाहनांना (कार, जीप, एसटी व सिटी बसेस) टोलमुक्ती देण्याचा निर्णय येत्या आॅगस्टमध्ये घेण्यात येईल, तर कोल्हापूरकरांना ३१ मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्ती दिली जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जाहीर केले. मुंबईतील एन्ट्री व एक्झिट पॉर्इंटवर टोल बंद करण्याबाबत वित्तीय व कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ही समिती ३० जुलैपर्यंत शासनाला अहवाल सादर करेल. त्यानंतर आॅगस्टपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल. येथून ८५ टक्के वाहने ही हलकी, चारचाकी वाहने असतात. टोलमुक्ती द्यायची म्हणजे कंत्राटदार कंपनीला २५०० ते तीन हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्याची तजवीज कशी करायची, याचे सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवित आहेत, असे पाटील यांनी सांगितले. कोल्हापूरचा फॉर्म्युला कोल्हापूरमधील टोल बंद करायचा, तर आम्हाला ६०० कोटी रुपये द्या, अशी मागणी कंत्राटदार आयआरबी कंपनीने केली आहे. सरकार आणि महापालिकेच्या म्हणण्यानुसार हा आकडा ३२५ कोटी रुपयांपर्यंत जातो. सुवर्णमध्य म्हणून ३५० कोटी रुपयांची रक्कम निश्चित झाली, तर ती रक्कम महापालिकेने आयआरबीला द्यावी लागेल. त्यासाठी राज्य शासन एवढी रक्कम कोल्हापूर महापालिकेला कर्ज वा अनुदान स्वरूपात देण्यास तयार आहे.महापालिकेने आयआरबीला एक लाख चौरस फुटांचा भूखंड दिला आहे. या भूखंडावर आयआरबीला वाढीव एफएसआय द्यावा, असाही एक प्रस्ताव आहे. त्यामुळे यासंदर्भात नेमलेली समिती याबाबतचा फॉर्म्युला निश्चित करेल आणि कोल्हापूरकरांना ३१ मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्तीची बातमी दिली जाईल, असे पाटील म्हणाले. राष्ट्रीय महामार्गांवरील नाक्यांवरही टोलमुक्ती राष्ट्रीय महामार्गांवर हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा फॉर्म्युला केंद्र सरकार करीत आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या महाष्ट्रातील ४० नाक्यांवर हलक्या वाहनांवरील टोल बंद होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली आजच या संदर्भात चर्चा झाली. हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा राज्याचा पॅटर्न केंद्र सरकार स्वीकारणार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)