शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू करप्रश्नी व्यापाऱ्यांच्या नजरा मुंबईकडे

By admin | Updated: January 10, 2015 00:25 IST

साडेबारा टक्क्यांचा प्रश्न प्रलंबितच : अर्थ व नियोजन मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

संदीप बावचे - जयसिंगपूर -अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्केकराचा प्रश्न सोडविण्याबाबत नुकतेच अर्थ व नियोजनमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे तंबाखू व्यापाऱ्यांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत. व्हॅटप्रश्नी शासन कशाप्रकारे हा प्रश्न सोडवून व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार, की तो पुन्हा लांबणीवर पडणार, याचीच उत्सुकता आहे.
तत्कालीन आघाडी शासनाने अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के मूल्यवर्धित कर प्रस्तावित केला होता. हा कर जयसिंगपूर शहरातील तंबाखू पेठेचे अस्तित्व पुसून टाकणारा ठरला. गेल्या दोन वर्षांपासून अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के कराचा प्रश्न भिजत पडला आहे. अद्याप शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने शहरातील व्यापारी हा व्यवसाय नजीकच्या कर्नाटक राज्यात स्थलांतरित करण्याच्या पवित्र्यात आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तंबाखू व्यापाऱ्यांच्या शिष्यमंडळाने अनेकवेळा निवेदने देऊन अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के व्हॅट कमी करावा. व्हॅटमुळे तंबाखू उद्योगावर विपरित परिणाम झाल्याचेही स्पष्ट केले होते.
व्हॅटमुळे तंबाखू उद्योगातील महिला, हमाल, गाडीवान यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही लक्षात आणून दिले होते. मात्र, हा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला. दरम्यान, २ जानेवारी रोजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यापारी शिष्टमंडळाला करप्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊन दहा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे अर्थ व नियोजन मंत्र्यांच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आश्वासनांचाच पूर
अनुउत्पादित तंबाखू कराचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’च आहे. यामुळे प्रक्रिया तंबाखू पुरवठा करणाऱ्या जयसिंगपूर पेठेचे अस्तित्व मूल्यवर्धित करामुळे धोक्यात आले आहे. येथील तंबाखू पेठेवर घाला घालणारा हा कर रद्द करून या व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या प्रतिनिधींना अनेकवेळा साकडे घातले. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेले नाही.

व्यवसायावर अनेक हात अवलंबून
१९७१ पासून तंबाखू व इतर शेतीमालाच्या व्यवसायासाठी शहरातील व्यापारी पुढे आला. यामुळे तंबाखू पेठेला चांगला राजाश्रय मिळाला. गेल्या नऊ दशकांपासून देशभरातील विक्रेत्यांकडे येथील तंबाखू पाठविला जात आहे. एक हजार माथाडी कामगार, पाच हजार महिला कामगार, शंभर बैलगाडी वाहतूकदार या व्यवसायावर अवलंबून आहेत.