शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:10 IST

पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ हत्तीणीच्या (माधुरी) पुनर्वसनाच्या हालचालींमध्ये पेटा इंडिया या प्राणी संरक्षण संस्थेच्या नव्या पत्रातून महाराष्ट्रात वन्य हत्तींच्या उपचार व पुनर्वसनासाठी आवश्यक दर्जाच्या सुविधा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, याबाबत नांदणी मठाच्या वकिलांनी पेटा या संस्थेचा हा मुद्दा खोडून काढला आहे.

पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे. महादेवीला शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक-मानसिक पुनर्वसनासाठी अनुकूल जागा मिळवून देणं हा आमचा एकमेव हेतू आहे, महाराष्ट्रात तिला पाठवण्याला आमचा विरोध नाही पणमहाराष्ट्रात वनताराच्या तोडीच्या सुविधा नसल्याने तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र पेटाच्या ताज्या भूमिकेला मठाच्या वकिलांनी उत्तर दिले आहे. पेटाच्या म्हणण्यानुसार, महादेवीच्या पुनर्वसनासाठी शांत परिसर, मुबलक पाणी, तज्ज्ञ वैद्यकीय सेवा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्याला वनतारा सहकार्य करणार असल्याने पेटाचा या मुद्याचा प्रश्नच येणार नसल्याचे वकील मनोज पाटील यांनी सांगितले आहे. वन तारा नको तर कर्नाटकात पाठवा -पेटाच्या मते, महाराष्ट्रात योग्य सुविधा नसल्याने महादेवीला वनतारा (गुजरात) येथेच ठेवणं हितावह ठरेल. तसेच उत्तर प्रदेशातील ‘Wildlife SOS’ किंवा कर्नाटकमधील ‘Wildlife Rescue and Rehabilitation Centre’ येथे तिला सुरक्षित व आरोग्यपूर्ण निवृत्ती मिळू शकते, तर त्या ठिकाणी पाठवण्यासही ते तयार आहेत.

पुनर्वसन हाच एकमेव उद्देशदरम्यान, हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्यास ते योग्य निर्णय देतील असा विश्वास पेटाने याच पत्रात व्यक्त केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVantaraवनतारा