शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

Mahadevi Elephant: आत्मक्लेश पदयात्रेमुळे हायवे, कोल्हापूर-सांगली मार्ग झाला होता ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:17 IST

कोल्हापूर : नांदणी मठातील हत्ती परत मिळावा यासाठी नागरिकांनी काढलेल्या मूक पदयात्रेमुळे रत्नागिरी-नागपूर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ ...

कोल्हापूर : नांदणी मठातील हत्ती परत मिळावा यासाठी नागरिकांनी काढलेल्या मूक पदयात्रेमुळे रत्नागिरी-नागपूर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जिल्हा पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४५० पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने आली. हजारोंच्या जनसमुदायामुळे वाहनधारकांना काही काळ महामार्गावर एकेरी वाहतूक करावी लागली. सांगली फाटा ते तावडे हॉटेल या परिसरात पदयात्रा येताच महामार्ग पोलिसांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर काही काळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली. शहरातही पोलिसांनी एक मार्ग पदयात्रेसाठी रिकामा ठेवून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवली. ताराराणी पुतळा चौक परिसर, ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल, स्टेशन रोडवर काही काळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली होती. दोन्ही महामार्गांसह शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा उपस्थित होता.बंदोबस्त

  • अपर पोलिस अधीक्षक - २
  • पोलिस उपअधीक्षक - ३
  • पोलिस निरीक्षक - ७
  • सहायक पोलिस निरीक्षक - १५
  • पोलिस उपनिरीक्षक -१५
  • पोलिस अंमलदार - ३५०
  • महामार्ग पोलिस - ५५