शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

'बेल्जी' श्वानाने लावला पहिला वन गुन्ह्याचा छडा, ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीच्या श्वानासोबत डॉग ट्रेनर सारिका जाधव यांची कामगिरी

By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2025 12:53 IST

लष्करी शिस्तीचे खडतर प्रशिक्षण घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुजू झालेल्या वनरक्षक सारिका जाधव या राज्यातील पहिल्या डॉग ट्रेनर

संदीप आडनाईककोल्हापूर : लष्करी शिस्तीचे खडतर प्रशिक्षण घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुजू झालेल्या वनरक्षक सारिका जाधव या राज्यातील पहिल्या डॉग ट्रेनर आहेत. ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे श्वान घेऊन व्याघ्र प्रकल्पात रुजू होताच मोराच्या शिकारीचा पहिल्याच वन गुन्ह्याचा छडा या श्वानाच्या मदतीने त्यांनी लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.डब्लूडब्लूएफच्या ट्रॅफिक इंडियामार्फत इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाकडून हरियाणातील पंचकुला येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी २८ आठवड्यांचा स्निफर डाॅग प्रशिक्षण कार्यक्रम राबविला होता. या शिबिरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वनरक्षक सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. या शिबिरामध्ये अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र या आठ राज्यांमधील वन कर्मचारी दाखल झाले होते. ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे १४ श्वानदेखील उपलब्ध करून दिले होते. या शिबिराला सह्याद्री व्याघ्र राखीवमधून फिरत्या पथकाच्या वनरक्षक सारिका जाधव यांना मुख्य ‘डॉग हँडलर’ आणि पाटणचे वनरक्षक अनिल कुंभार यांना सहायक ‘डॉग हँडलर’ म्हणून पाठवले होते. प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या श्वान प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत आठ राज्यांमधून सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 'बेल्जी'चे वैशिष्ट्यसारिका यांच्यासोबत वन विभागाच्या सेवेत रुजू झालेल्या 'बेल्जी' नावाचे श्वान चपळ आणि वास घेण्यात पटाईत आहे. २६ नोव्हेंबरला तिला एक वर्ष पूर्ण झाले. ही वाइल्ड लाइफ ट्रेंड श्वान वजनाने २६ ते २७ किलोची आहे. तीव्र वास घेण्याच्या क्षमतेमुळे तिने १५ डिसेंबरला उंडाळे येथील मोराच्या शिकारीचा छडा अवघ्या २० मिनिटांत लावला.ट्रॅकिंग, सर्चिंग, अवैध वस्तू, शिकारी शोधणे या कामांसाठी ही स्निफर डाॅग बुद्धिमत्ता, चपळता आणि मजबूत कार्यनीती दाखवते. वृक्षतोड आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी यासारखे बेकायदेशीर गुन्हे शोधून गुन्हेगारीच्या घटनांच्या तपासात तिची मदत होणार आहे.

ट्रॅफिक इंडिया ही वन्यजीव तस्करीवर देखरेख करणारी आघाडीची अशासकीय संस्था आहे. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले हे पथक ड्रग्ज, स्फोटके आणि वन्यजीव प्रतिबंधित वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तू शोधण्यात आणि अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास व शोधमोहीम अशा कामांत महत्त्वाचे ठरणार आहे. - तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक/संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

English
हिंदी सारांश
Web Title : Belgi the dog solves forest crime with trainer Sarika Jadhav.

Web Summary : Forest guard Sarika Jadhav, a dog trainer, and her Belgian Shepherd, Belgi, solved a peacock poaching case in Sahyadri Tiger Project. Belgi, skilled at tracking, quickly located the crime scene, showcasing the dog squad's effectiveness against wildlife crimes.