Students from Maratha community will bow down to Ambabai | मराठा समाजातील विद्यार्थी अंबाबाईला दंडवत घालणार

मराठा समाजातील विद्यार्थी अंबाबाईला दंडवत घालणार

ठळक मुद्देमराठा समाजातील विद्यार्थी अंबाबाईला दंडवत घालणारसोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दंडवताचा उपक्रम

कोल्हापूर : आरक्षणावर स्थगितीचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील विद्यार्थी  शुक्रवारी सकाळी ११ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला दंडवत घालणार आहेत.

शहरातील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर चौकातून दंडवत घालण्यास सुरुवात होईल. शासनाने विद्यार्थी आणि सुशिक्षित बेरोजगारांचे नुकसान टाळावे, पोलीस भरती त्वरित थांबवावी, अशी मागणी याद्वारे केली जाणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा दंडवताचा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली आहे.

Web Title: Students from Maratha community will bow down to Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.