शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘थेट पाईपलाईन’वरून आजच्या सभेत वादळी चर्चा

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

राजकीय संदर्भ बदलले : रोजंदारी कर्मचाऱ्यांंचेही सभेकडे लक्ष

कोल्हापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी होत आहे. पाचशेहून अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा ठराव सभेत केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणानंतर प्रथमच होणाऱ्या या सभेत थेट पाईपलाईन योजनेवरून पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर प्रथमच महापालिकेची ही सर्वसाधारण सभा होत आहे. यापूर्वीच्या दोनवेळा झालेल्या सभेत धोरणात्मक निर्णय होऊ शकले नाहीत. यामुळे या सभेत जागा भाड्याने देणे, राज्य शासनाच्या निर्णयाची सभागृहास माहिती देणे, नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी सभागृहाची मान्यता घेणे, आदी विषयांवर चर्चा व शिक्कामोर्तब होणार आहे. न्यायालयाच्या दणक्यामुळे महापालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली. ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महापालिकेच्या प्रशासनावर विश्वास ठेवून ३५०हून अधिक रोजंदारी कर्मचारी न्यायालयात गेले नाहीत. आता यांसह सर्वच ५००पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने न्याय द्यावा, ही मागणी क र्मचाऱ्यांतून होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाचे सर्वच संदर्भ बदलले आहेत. थेट पाईपलाईनच्या अंमलबजावणीवेळी नेत्यांनी व प्रशासनाने एकछत्री अंमल ठेवला. याचे पडसाद सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात उमटले. आता नव्या राजकीय संदर्भास उभारी मिळत असल्याने सभागृहातही थेट पाईपलाईनवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)फक्त स्टंट नको, निर्णय घ्यामहापालिकेच्या २८ जुलै २०१४ रोजीच्या सर्वसाधारण सभेत न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत, कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या सर्वसाधारण सभेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा विषय पुन्हा चर्चेसाठी घेतला आहे. फक्त चर्चा करून ठराव करू नका, तर ठोस निर्णय घ्या, अशी मागणी या कर्मचाऱ्यांतून होत आहे.