शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस हजारांवर अवजड वाहनांची चाके थांबणार, ५ मार्चला राज्यव्यापी आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:47 IST

ट्रक, बसचा सहभाग, व्यापार, उद्योगावर होणार परिणाम

कोल्हापूर : राज्यात अवजड वाहनांवर ई-चलनाद्वारे करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाई, बॉर्डर चेकपोस्ट बंद करावेत, या मागणीसाठी ट्रान्सपोर्टर आणि चालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ५ मार्चला राज्यव्यापी आंदोलन होत असून, चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

सरकारने विविध मागण्यांवर तोडगा काढला नसल्यास जिल्ह्यात ४० हजारांहून अधिक अवजड वाहनांची चाके थांबणार आहेत. बेमुदत आंदोलन झाल्यास व्यापार, उद्योगावर परिणाम होणार असून, आयात-निर्यात थांबणार आहे.

जिल्ह्यातील वाहतूकदारांनी ई-चलन, चेकपोस्ट नाके, पार्किंगच्या अडचणी प्रश्नी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. जिल्हा प्रशासनालाही निवेदन दिले आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काही निर्णय झाला नसल्याने जिल्ह्यातील अवजड वाहतूकदार चक्का जाम करण्याच्या तयारीत आहेत.

ई-चलन वसुलीला विरोध

परिवहन विभागाने इ-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नव्या नियमांत संबंधित वाहनधारकाला दंड केल्यास १५ दिवसांत भरावा लागेल. तो भरला नसल्यास संबंधित प्रकरण न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी आहे. तेथेही वाहन मालकाने काही तडजोड केली नसल्यास वाहनांवर महसुली बोजा चढविला जाणार आहे. त्यामुळे या कारवाईला अवजड वाहतूकदारांनी विरोध दर्शविला आहे.

काय होणार परिणाम

कोल्हापुरात सहा, दहा, बारा, चौदा आणि सोळा चाकी ट्रकमधून मालवाहतूक केली जाते. त्यात साखर, गूळ, सिमेंट, वाळू, औद्योगिक वसाहतीतील मोठ्या मशिनरी, एक्स्पोर्स मशीन, कांदा, बटाटा, तेल, आटा, मैद्याची वाहतूक केली जाते. ही वाहतूक कोल्हापुरात गोवा, केरळ, गुजरात राज्यात होते. तर तेथूनही काही साहित्य जिल्ह्यात येते.

कंटेनरमधून मोठी वाहतूक

कंटेनरमधून मोठ्या मशिनरीची वाहतूक केली जाते. त्यात २२ आणि ४० चाकी ट्रकचा समावेश आहे. त्यामधून पवनचक्कीच्या साहित्याची वाहतूक होते. चक्का जाम झाल्यास या सर्व उद्योग, व्यापारावर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यातील वाहनांची संख्या

  • टुरिस्ट कॅब : १७६३
  • खासगी बस : २३८०
  • ट्रक, लॉरीज : २२ हजार ४०४
  • ट्रेलर : ३४ हजार ३५०
  • ट्रॅक्टर : ५०७६३
  • स्कूल बस : ८०३

जिल्ह्यातील २२ हजारांवर ट्रक चालक मालक आंदोलन सहभागी होणार आहेत. सरकारने वाहतूकदारांच्या प्रश्नावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहे. - हेमंत डिसले, सेक्रेटरी, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन
 

दोन दिवसांपूर्वी वाहतूकदारांचे शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. प्रशासन त्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेईल. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur transporters to strike against e-challans, checkposts; state-wide protest.

Web Summary : Kolhapur transporters are protesting e-challans and checkposts, threatening a state-wide strike on March 5th. Over 40,000 vehicles will halt, impacting trade and industry if demands aren't met. The action follows unresolved grievances with transport authorities.