Kolhapur-Gokul Dudh Sangh: एकटे लढायचे हे ध्यानात घेऊन तयारीला लागा - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 19:26 IST2026-05-12T19:25:08+5:302026-05-12T19:26:54+5:30

दूध संस्थांशी संपर्क वाढवा

Start preparing keeping in mind that you will have to fight alone says Satej Patil | Kolhapur-Gokul Dudh Sangh: एकटे लढायचे हे ध्यानात घेऊन तयारीला लागा - सतेज पाटील

Artificial intelligence

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणुकीत कशा आघाड्या होतील ? हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे एकटे लढायचे आहे, हे ध्यानात ठेवून तयारीला लागा. असा कानमंत्र काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संघाच्या माजी संचालकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला.

गोकुळ’वर प्रशासकीय मंडळ कार्यरत झाले असले तरी निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर महायुती व काँग्रेस आघाडीमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढलेल्या ११०८ दूध संस्थांची सुनावणी लवकर घ्या, यासाठी सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर यांची भेट घेतली. 

तत्पूर्वी त्यांच्या कार्यालयात माजी संचालकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यामध्ये बिनविरोधसह आघाडीबाबत काही तडजोड झाली तर चर्चा करुच, पण आपणाला एकटे लढायचे आहे, हे लक्षात ठेऊन तयारीला लागा. संस्था प्रतिनिधींच्या गाठीभेटी सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगले, डॉ. चेतन नरके, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील-चुयेकर,प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, आदी उपस्थित होते.

Web Title : कोल्हापुर गोकुल डेयरी: अकेले लड़ने की तैयारी करें, सतेज पाटिल

Web Summary : सतेज पाटिल ने गोकुल डेयरी के अधिकारियों से अकेले चुनाव लड़ने की तैयारी करने का आग्रह किया। उन्होंने प्रतिनिधियों से मिलने पर जोर दिया। गठबंधन के संबंध में चर्चा खुली है, लेकिन स्वतंत्र तैयारी महत्वपूर्ण है। उन्होंने दूध संस्थानों के लिए लंबित सुनवाई को भी संबोधित किया।

Web Title : Kolhapur Gokul Dairy: Prepare to fight alone, says Satej Patil.

Web Summary : Satej Patil urged Gokul Dairy officials to prepare to fight elections alone. He emphasized meeting with representatives. Discussions regarding alliances are open, but independent preparation is key. He also addressed pending hearings for milk institutions.