शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सॉक्समध्ये स्टड अडकले अन् वादावादी झाली

By admin | Updated: January 9, 2015 00:27 IST

बालगोपाल आणि प्रॅक्टिस, बालगोपाल आणि शिवाजी असे सामने त्याकाळी फार रंगत होते.

सत्तरीच्या दशकात आमचा एका स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबबरोबर सामना सुरू होता. सामन्यादरम्यान माझ्या बुटाचे स्टड ‘प्रॅक्टिस’च्या दिलीप वायचळच्या सॉक्समध्ये अडकले. दिलीपला वाटले, मी त्याला लाथ मारतोय; त्यामुळे सामन्यात आमच्यात जोरदार वादावादी झाली अन् आम्ही एकमेकांच्या अंगावर धावून गेलो... असा किस्सा ‘बालगोपाल’चे माजी फुटबॉलपटू प्रकाश मंडलिक सांगत होते. बालगोपाल आणि प्रॅक्टिस, बालगोपाल आणि शिवाजी असे सामने त्याकाळी फार रंगत होते. त्यांत असाच एक सामना शाहू स्टेडियमवर सुरू होता. त्यात मी बचावफळी सांभाळत असल्याने साहजिकच येईल तो चेंडू परतावून लावणे हे माझे कर्तव्यच होते. माझा जवळचा मित्र दिलीप वायचळ प्रॅक्टिसकडून आघाडीवर खेळत होता. खेळताना माझ्या पायातील बुटाचे स्टड त्याच्या पायमोजात अडकले. त्याला वाटले मी लाथ मारतोय; त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात जोरदार वादावादी झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावूनही गेलो; पण हा प्रसंग आम्ही येथेच विसरलो. सामना संपल्यानंतर आम्ही पुन्हा मैदानाबाहेर मिरजकर तिकटीला नेहमीप्रमाणे भेटलो. आमच्या मैत्रीवर या वादाचा कोणताच परिणाम झाला नाही.
माझे वडील बाळकृष्ण मंडलिक हे बालगोपाल तालीम मंडळ फुटबॉल संघाचे संस्थापक होते. त्यांनी बाराईमाम तालीम मंडळाचा संघ फोडून ‘बालगोपाल’चा नवा संघ तयार केला. त्यामुळे मला त्यांच्यापासून फुटबॉलची आवड निर्माण झाली. पुढे मी गोखले कॉलेजकडून झोनल, आंतरविद्यापीठ, आंतरमहाविद्यालयीन, आदी स्पर्धा खेळलो. या स्पर्धांमध्ये साताऱ्याच्या एका संघाबरोबर आम्ही २४ गोल केले होते.
यात दिलीप कोठावळे, अजित यादव यांनी हे गोल केले होते. मला प्रभाकर मगदूम, नारायण पिसे, विनोद केलान, दिलीप कोठावळे, बाबू घाटगे, बाजीराव मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, दिलीप वायचळ, सुभाष सरनाईक, आदींबरोबर खेळण्यास मिळाले. बालगोपाल संघाने यादरम्यान कोल्हापुरात प्रथमच ‘वॉर्म अप’ करण्याचा प्रकार अवलंबला.
आजचे खेळाडू सामन्यात तत्काळ जागा बदलत नसल्याने खेळात तोचतोचपणा येत आहे; त्यामुळे स्कोअर करण्यात ही मुले कमी पडत आहेत.


यांनी घडविला
कोल्हापूरचा फुटबॉल...