शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’वरून शिवसेनेचे उमेदवार जाहीर होणार

By admin | Updated: August 17, 2015 00:01 IST

दुधवडकर : कार्यकर्त्याला पहिले प्राधान्य; अभियान पत्रकाचे प्रकाशन

कोल्हापूर : ‘शिवसेना माझी! मी शिवसेनेचा मतदार ’ या अभियानाद्वारे आमचे शिवसैनिक घरोघरी जाऊन मतदान करण्याविषयी व इतर समस्यांकरिता नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनाही त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट दिले जाणार आहे. तिकीट देताना शिवसैनिकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असून उमेदवारांची अंतिम यादी ‘मातोश्री’वरूनच जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. ‘शिवसेना माझी, मी शिवसेनेचा मतदार’ या अभियान पत्रकाच्या प्रकाशनप्रसंगी ते रविवारी शिवसेना कोल्हापूर मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. दुधवडकर म्हणाले, आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरच लढवू. जे पक्ष आणि संघटना आमच्याबरोबर येण्यास इच्छुक आहेत, त्यांनाही सोबत घेऊन आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवू.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, ताराराणी आघाडीने ग्रामीण भागातील लोकांची बोगस मतदार नोंद शहरात केली आहे. त्या मतदारांचाही शोध या मोहिमेद्वारे करू. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, आम्ही एकदिलाने काम करून ही महापालिका निवडणूक जिंकून दाखविणार आहे. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, विनायक साळोखे, किशोर घाटगे, नगरसेवक संभाजी जाधव, नगरसेवक राजू हुंबे, दत्ता टिपुगडे, अजित गायकवाड, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, आदी उपस्थित होते.एकी केवळ कार्यक्रमापुरतीच ?एकदिलाने काम करण्यासाठी आमदार गट व संजय पवार गट यांनी एकत्रित येऊन काम करावे, याकरिता वरिष्ठ नेत्यांची ‘समझोता एक्स्प्रेस’ नुकतीच येऊन गेली, तरीही रविवारच्या या कार्यक्रमासाठी आमदारांचे कार्यकर्ते मध्यवर्ती कार्यालयासमोर उभे होते, तर संजय पवार यांचे कार्यकर्ते महापालिकेसमोर उभे होते. संपर्कप्रमुख येण्याअगोदर पाच मिनिटांपूर्वी पवार गटही कार्यालयात दाखल झाला. त्यामुळे एकी केवळ कार्यक्रमापुरती होती की काय, असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नव्हता.