शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

सेवाकरामुळे खिशाला चाट, आॅनलाईन पेमेंटधारकांनाही भुर्दंड

By admin | Updated: June 3, 2015 01:05 IST

कोल्हापूर शहरातून सेवाकराद्वारे शासनाला दरवर्षी १६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ वाढीव सेवाकरांमुळे या उत्पन्नात सुमारे पावणेदोन कोटींची भर पडणार

कोल्हापूर : सेवाकरातील वाढ सोमवारपासून लागू झाली आहे़ गत आर्थिक वर्षात १२़३६ टक्के असलेला सेवाकर यावर्षीपासून आता चौदा टक्के करण्यात आला आहे़ या वाढीव सेवाकरांमुळे बँकिंग, पर्यटन, हॉटेल, रेस्टॉरंट, विमा, बांधकाम, के्रडिट कार्ड, आर्किटेक्ट, खासगी कोचिंग क्लास या क्षेत्रातील सेवा महागणार आहेत. आॅनलाईन पेमेंटपद्धती वापरणाऱ्यांना मात्र उपभोग घेतलेली सेवा आणि सेवेच्या बिलांची पूर्तता असा दुहेरी भुर्दंड बसणार आहे़ कारण आॅनलाईन पेमेंट सेवा ही सेवाकराच्या कक्षेत आहे़ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ साठी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी सेवाकराची आकारणी १४ टक्के इतकी केली आहे़ या वाढीव सेवाकरामुळे अगोदरपासून महागाईच्या गर्तेत अडकलेल्या नागरिकांच्या खिशाला चाट बसणार आहे़ कारण सेवा कर हा अप्रत्यक्ष कर असतो़ हा कर सेवा देणारा भरत असला तरी, त्याची वसुली ग्राहकांच्या खिशांमधूनच केली जाते़ एप्रिल ते सप्टेंबर आणि आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत सेवाकराचे रिर्टन आॅनलाईन भरले जातात़ यावर्षी हा कर १ जूनपासून लागू झाल्यामुळे पूर्ण वर्षाचा कर भरण्यापासून करदात्यांची सुटका झाली आहे़ कोल्हापूर शहरात ५०५० सेवाकर दाते आहेत़ यामध्ये प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉँरंट, बांधकाम, आदी क्षेत्रांतील सेवाकर दात्यांचा समावेश आहे़ कोल्हापूर शहरातून सेवाकराद्वारे शासनाला दरवर्षी १६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ वाढीव सेवाकरांमुळे या उत्पन्नात सुमारे पावणेदोन कोटींची भर पडणार आहे़ निगेटिव्ह यादीतील कृषी क्षेत्राशी संबंधित सेवा तसेच रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांना हा कर लागू नाही़ अशी माहिती कोल्हापूर सेवाकर विभागाचे अधीक्षक संदीप विचारे यांनी दिली़ (प्रतिन् िाधी)आॅनलाईन पेमेंट करणाऱ्यांना दुहेरी चाटअनेक ग्राहक विविध प्रकारची पेमेंट करण्यासाठी के्रडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतात़ दोन हजार रुपयांपर्यंतचे आॅनलाईन पेमेंट सेवाकर मुक्त होते़; पण ही मर्यादा एका व्यवहारासाठी दोन हजारांहून पाचशे रुपयांपर्यंत करण्यात आली आहे़ त्यामुळे घेतलेल्या सेवेपोटी पाचशेपेक्षा जास्त रुपयांचे आॅनलाईन पेमेंट करणाऱ्यांना ग्राहकांना वाढीव सेवाकराबरोबरच डेबिट व के्रडिट कार्डच्या सेवेसासाठीही सेवाकर असा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागणार आहे़ हायलाईट्स : सेवाकर सेवाकर हा अप्रत्यक्ष कर आहे़ १९९४ पासून लागू कोल्हापुरातील सेवाकर दात्यांची अंदाजित संख्या : ५०५० करातून मिळणारे उत्पन्न : १६० कोटी