शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

अवैद्य बांधकाम प्रकरण : सभेत होणार निर्णय

कोल्हापूर : नगरसेवकपदाचा गैरवापर करून अवैध बांधकाम केल्याबद्दल नगरसेविका सरस्वती पोवार व माजी नगरसेवक दिलीप पोवार यांच्या अहवालाबाबतचा निर्णय शनिवारी (दि. १७) होणाऱ्या सभेत होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यास अवैध बांधकामप्रकरणी पोवार यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. तसेच प्रस्ताव अमान्य केल्यास शहरातील अवैध बांधकामास खतपाणी घालण्याचा आरोप होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी सभागृहात कोणता निर्णय होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. याव्यतिरिक्त रहदारीमुळे महाराणा प्रताप चौकातील झाकीर हुसेन शाळेचे स्थलांतर, पे अ‍ॅँड पार्कची निविदा, अग्निशमन दलातील जवानांचा विमा, आदी विषयांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
कनाननगर प्रभागातील नगरसेविका सरस्वती पोवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत अवैध बांधकाम केले आहे. या बांधकामाबाबतचा ताराराणी विभागीय कार्यालयाने चौकशी अहवाल तयार केला आहे. मागील महिन्यात महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत हा अहवाल सभागृहाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, सभागृहाने ‘पुढील बैठक’ असा शेरा मारीत वेळ मारून नेली. सभागृहाने या अहवालावर निर्णय घेत कारवाईची परवानगी दिल्यास पोवार यांचे पद धोक्यात येऊ शकते. तर कारवाईची परवानगी न दिल्यास शहरातील इतर अवैध बांधकामांबाबत कारवाई करताना प्रशासनाची गोची होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाबाबत सभागृह काय निर्णय घेणार , याबाबत उत्सुकता आहे. अवैद्य बांधकामाबाबत सभागृह कठोर भूमिका घेणार, की सभागृह प्रतिनिधीसाठी मवाळपणा दाखवणार यावर शहरातील अवैध बांधकामाचे भवितव्य ठरणार आहे.
या निर्णयासोबतच सभेत महाराणा प्रताप चौकातील
डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेचे सुसरबागेतील रंगराव विद्यामंदिर या शाळेत विलीनीकरण करण्याबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे.
१९७८ पासून ही शाळा मध्यवर्ती ठिकाणी भरत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत या परिसरात वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून जाण्या-येण्याचा त्रास होतो. विद्यार्थी, शिक्षक यांना वर्दळीचा त्रास होतो. पालकांना विद्यार्थ्यांना दररोज शाळेत सोडण्या व आणण्याशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि चांगल्या शैक्षणिक वातावरणासाठी ही शाळा सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक रमेश पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)


महापालिकेच्या अग्निशमन दलात १२२ कायम, तर ४५ ठोक मानधनावर कर्मचारी आहेत. ठोक मानधनावरील २३ फायरमन व २२ वाहनचालक यांचा पीए पॉलिसी टेबल ३ प्रमाणे अपघाती दोन लाख, तर रोड सेफ्टी एक लाख असा तीन लाखांचा विमा सभागृहाच्या संमतीने उतरविण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील पार्किंगची कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या पे अ‍ॅँड पार्क पार्किंग जागेचा ठेका देण्यासाठी निविदा काढण्याबाबत सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे.