शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील गट- महाडिक आमनेसामने येणार; बिंदू चौकात तणावाचे वातावरण

By विश्वास पाटील | Updated: April 14, 2023 19:12 IST

माजी मंत्री आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे.

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामधील माजी मंत्री आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे. शुक्रवारी सकाळी माजी आमदार अमल महाडिक यांनी पाटील गटाला आज संध्याकाळी ७ वाजता बिंदू चौकात या असे आव्हान दिले. त्यास प्रत्युत्तर म्हणून पाटील गटाचे कार्यकर्ते बिंदू चौकात जाणार असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळी वडणगे (ता.करवीर) येथे सत्तारुढ महाडिक गटाचा प्रचार प्रारंभ झाला. त्यामध्ये अमल महाडिक यांनी तुम्ही कारखान्यांवर वाट्टेल तसे आरोप करता, हिंमत असेल तर केलेल्या आरोपांची कागदपत्रे घेवून बिंदू चौकात या..आम्हीही तुमच्या डी.वाय.पाटील कारखान्याची कागदपत्रे घेवून बिंदू चौकात येतो असे जाहीर आव्हान दिले. त्यानंतर त्यांच्या गटातर्फे सोशल मिडीयावर तशा पोस्टही व्हायरल झाल्या.

त्यास प्रत्यूत्तर म्हणून सतेज पाटील गटानेही चॅलेंज स्विकारले, आम्ही बिंदू चौकात येतोय असे सांगत कार्यकर्त्यांना अजिंक्यतारा या कार्यालयावर बोलवले आहे. अमल महाडिक यांंना प्रत्यूतर देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील हे कार्यकर्त्यासह जाणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने बिंदू चौक भीम अनुयायांनी सकाळपासूनच फुलला आहे.

शहराच्या दोन भागांतून सायंकाळी भिमसैनिकांच्या भीमरायाला अभिवादन करण्यासाठी मिरवणूका येणार आहेत. असे असताना पाटील-महाडिक गटाचे कार्यकर्ते तिथे जमले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण होवू शकतो. निवडणूक कारखान्याची आहे. त्याबध्दल आरोप-प्रत्यारोप जरुर करावेत परंतू असे रस्त्यावर उतरण्याची भाषा दोन्ही नेत्यांनी टाळण्याची गरज आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिकMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक