शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाच्या खूनाचा उलगडा : चौघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:19 IST

साळोखे पार्क, भारतनगर येथे राहणाऱा रिक्षाचालक लक्ष्मण भागवत डावारे (वय ३१, रा. भारतनगर, साळोखे पार्क) याचा तोंडावर उशी ठेवून, गळा आवळून खून करून मृतदेह ओढ्यात टाकणाऱ्या चौघा संशयितांना जुना राजवाडा पोलीसांनी शुक्रवारी अटक केली.

ठळक मुद्देरिक्षाचालकाच्या खूनाचा उलगडा : चौघा संशयितांना अटकपत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून खून

कोल्हापूर :साळोखे पार्क, भारतनगर येथे राहणाऱा रिक्षाचालक लक्ष्मण भागवत डावारे (वय ३१, रा. भारतनगर, साळोखे पार्क) याचा तोंडावर उशी ठेवून, गळा आवळून खून करून मृतदेह ओढ्यात टाकणाऱ्या चौघा संशयितांना जुना राजवाडा पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. यात संशयित किशोर भगवान आयरे (वय ३०), करण नंदकुमार कंगले (वय २१), अमोल दिलीप खर्जे, समाधान बळी कांबळे (वय २६ सर्व रा. भारतनगर , साळोखे पार्क ) या चौघांचा समावेश आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनूसार मयत रिक्षाचालक लक्ष्मण डावरे हा साळोखे पार्क येथे राहत होता. त्याच्या शेजारी किशोर आयरे यांचे दुकान व घर आहे. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित आयरे याच्या पत्नीशी मयत लक्ष्मण याचे अनैतिक संबध असल्याचा संशय संशयित किशोर यास होता.

याबाबत वारंवार दोघांमध्ये भांडणे होत होती. बुधवारी (दि. ३) या दोघांत भांडणेही झाल्याची माहीती शेजाऱ्यांकडून पोलीसांना समजली. त्यानंतर आयरे याने (दि. ३) च्या मध्यरात्री त्याच्या शिवाय घरात कोणी नसल्याची खात्री संशयितांनी केली. त्यानंतर घरी प्रवेश करीत त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्याचा खून करण्यात आला. त्याच रात्री संशयित किशोर याने मित्राची रिक्षा अगोदरच आणून ठेवली होती. त्यातून मयत लक्ष्मणला घालून त्याचा मृतदेह आयसोलेशन च्या मागील बाजूस असणाऱ्या ओढयात टाकून दिला.

प्रथमक्षणी बघणाऱ्याला तो तरंगताना दिसला. त्यामुळे कोणीतरी पाण्यात बूडून अथवा आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले. मात्र, पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर त्याचा शव विच्छेदन अहवाल आला. त्यात गळा आवळून खून केल्याचे निष्पन झाले. त्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवित जुना राजवाडा पोलीसांनी गुरूवारी रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत यातील संशयितांना ताब्यात घेतले.

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस