शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पूर पाणीपातळीत घसरण; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:47 IST

अद्याप ५५ मार्ग पाण्याखाली : पिके सलग दहा दिवस पाण्यात

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे. पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीची पातळी हळूहळू कमी होत असून, ४०.५ फुटांपर्यंत आली आहे. नदीकाठची पिके सलग आठ दिवस पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेली दोन दिवस पाऊस काहीसा कमी आहे, तरीही दिवसभर उघडझाप असली, तरी रात्री अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. रविवारी सकाळी काहीकाळ ऊन पडले होते. दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे. वारणेतून ११ हजार ५७०, दूधगंगेतून ९ हजार २५० घनफूट पाणी बाहेर पडत असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. साधारणत: तासाला एक इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. नदीकाठची ऊस, भात, सोयाबीन पिके दहा दिवस पाण्याखाली असल्याने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतित आहे.अद्याप ६८ बंधारे पाण्याखाली असल्याने एसटीचे २० मार्ग बंद आहेत, १० राज्य, तर ४५ प्रमुख जिल्हामार्ग, असे ५५ मार्ग बंद आहेत.

पडझडीत २२ लाखांचे नुकसानजिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये २२ लाख २३ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.पाणी संथगतीने कमी दिवसभरात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचे पाणी एकदम संथगतीने कमी होत आहे. रविवारी दिवसभरात केवळ ६ इंचांनी पुराचे पाणी कमी झाले होते.

दृष्टिक्षेपात पाऊस :सध्याची पातळी : ४०.५ फूटबंधारे पाण्याखाली : ५८मार्ग बंद : ५५नुकसान : ७५ मालमत्तानुकसानीची रक्कम : २२ लाख २३ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणradhanagari-acराधानगरी