ढगाळ वातावरणासह पाऊस, थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:06 PM2020-09-26T18:06:36+5:302020-09-26T18:08:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पाऊस उसंत घेत असला तरी ढगाळ वातावरण व जोरदार सरी कोसळत होत्या. धरणक्षेत्रांतही कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू आहे. दिवसभर थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारठा जाणवत होता.

Rain with cloudy weather, hail in cold weather due to cold winds | ढगाळ वातावरणासह पाऊस, थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा

ढगाळ वातावरणासह पाऊस, थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा

Next
ठळक मुद्देढगाळ वातावरणासह पाऊसथंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पाऊस उसंत घेत असला तरी ढगाळ वातावरण व जोरदार सरी कोसळत होत्या. धरणक्षेत्रांतही कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू आहे. दिवसभर थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारठा जाणवत होता.

शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. रात्रभर भुरभुर राहिली. शनिवारी सकाळपासूनही सर्वच तालुक्यांत पाऊस सुरू होता. काही ठिकाणी हलक्या तर कुठे जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरणासह थंड वारे वाहत असल्याने अंगातून थंडी जात नव्हती. कोल्हापूर शहरातही अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या.

धरणक्षेत्रांतही पाऊस सुरू असून विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद एक हजार, वारणा धरणातून १२६७, तर दूधगंगा धरणातून १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पातळी १५.११ फुटांवर आहे. उद्या, रविवारीही ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू राहील. मात्र  सोमवारपासून बुधवारपर्यंत पाऊस काहीशी उसंत घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 

Web Title: Rain with cloudy weather, hail in cold weather due to cold winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.