शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Radhanagari Vidhan Sabha Election Result 2024: राधानगरी मतदारसंघातून शिंदेसेनेच्या प्रकाश आबिटकर यांची निर्णायक आघाडी

By विश्वास पाटील | Updated: November 23, 2024 11:07 IST

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे नवव्या फेरीअखेर १०५३३ मतांनी आघाडीवर आहेत. एकूण कल ...

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे नवव्या फेरीअखेर १०५३३ मतांनी आघाडीवर आहेत. एकूण कल पाहता आमदार आबिटकर यांची ही निर्णायक आघाडी मानली जाते.

या मतदार संघातून उध्दवसेनेचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आबिटकर यांना तगडे आव्हान दिले. कधी नव्हे ती राधानगरी तालुक्यातील काँग्रेस के.पी.पाटील यांच्या मागे एकवटली होती. झाडून सारे मातब्बर नेते त्यांच्यामागे होते. परंतू आमदार आबिटकर सुरुवातीपासूनच नेते कुणाकडेही असले तरी जनता माझ्यासोबत आहे यावर ठाम होते. मतपेटीतून तसेच चित्र पुढे येताना दिसत आहे. आमदार आबिटकर यांनी केलेली विकासकामे, उत्तम संपर्क, तरुणाईला भावणारे व्यक्तिमत्व, सुखदु:खाला धावून येणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा होती, तिलाच जनतेने मतपेटीतून बळ दिल्याचे दिसत आहे. 

के.पी.पाटील यांना उशीराने जाहीर झालेली उमेदवारी, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यात आलेल्या अडचणी, शिवाय तुम्ही बिद्री कारखाना चांगला चालवताय तर त्याकडेच लक्ष द्या असाही मेसेज जनतेने आतापर्यंतच्या निकालावरून दिल्याचे दिसत आहे. या मतदार संघात ए.वाय.पाटील यांनी बंडखोरी केली होती परंतू त्यांचा तसा आबिटकर यांनाही फार फायदा झाल्याचे दिसत नाही. आबिटकर स्वत:च्या ताकदीवरच निकालात पुढे सरकल्याचे दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024radhanagari-acराधानगरीPrakash abitkarप्रकाश आबिटकरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेK P. Patilके. पी. पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024