शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागधारकांची वीज जोडणी सक्तीने बंद करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील यंत्रमाग उद्योगांच्या वीज बिलांची सक्तीने वसुली ...

: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील यंत्रमाग उद्योगांच्या वीज बिलांची सक्तीने वसुली करू नये. वीज जोडणी सक्तीने बंद केल्यास यंत्रमाग उद्योजकांसह यावर अवलंबून असलेल्या इतर उद्योगातील कामगारांच्या पोटाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. यंत्रमागधारकांचे बॅँक कर्ज व हप्ते थकतील व ते आणखीनच अडचणीत येतील. त्यामुळे याबाबत तातडीने योग्य ते आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना दिले.

निवेदनात, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून विविध कारणाने यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. यातच कोरोना महामारीमुळे उद्योग अधिक अडचणीत आला. लॉकडाऊनमुळे पूर्ण बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी येणे बंद असल्याने यंत्रमागधारक वीज बिले एकावेळी भरू शकले नाहीत. यामुळे मागीलवर्षी बिलाचे समान हप्ते केले. मार्च २०२१ ला पुन्हा लॉकडाऊन केले. अद्यापही बाजारपेठा सुरळीत नसल्याने मालाच्या विक्रीत अडचणी येत आहेत. यामुळे यंत्रमागधारकांना आर्थिक संकटांना तोड द्यावे लागत आहे.

सध्या महावितरणकडून ५० टक्के रक्कम भरण्याची सक्ती केली जात असून, बिल न भरल्याने वीज जोडणी सक्तीने तोडली जात आहे. यंत्रमागधारक हे वीज बिल भरणार असल्याने मार्च २०२१ मध्ये बंद झालेली थकीत वीज बिलाच्या हप्त्याची योजना मार्च २०२२ पर्यंत सुरू ठेवावी. यंत्रमागधारक हे मार्च २०२१ पर्यंतची थकीत बिले भरण्यास तयार असून, उर्वरित रकमेसाठी समान हप्ते करून द्यावेत, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, दत्तात्रेय कनोजे, चंद्रकांत पाटील, नारायण दुरगुडे, मोहम्मद रफीक खानापुरे, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, प्रमोद महाजन यांच्यासह यंत्रमागधारकांचा समावेश होता.

फोटो ओळी

२६०८२०२१-आयसीएच-०६

इचलकरंजीत महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना आमदार प्रकाश आवाडे यांनी निवेदन दिले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, दत्तात्रय कनोजे आदी उपस्थित होते.