सतेज- मुश्रीफांची टोलेबाजी; अमल महाडिक यांचे स्मितहास्य, जिल्हा बँकेतील नेत्यांच्या संवादाची जिल्ह्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:53 IST2026-04-29T11:53:09+5:302026-04-29T11:53:56+5:30

जिल्हा बँकेच्या बैठकीत आज राजकारणापलीकडची मैत्री आणि टोलेबाजी पाहायला मिळाली.

Political Banter in Kolhapur: Satej Patil Jabs Hasan Mushrif Over Growing Proximity with Amal Mahadik | सतेज- मुश्रीफांची टोलेबाजी; अमल महाडिक यांचे स्मितहास्य, जिल्हा बँकेतील नेत्यांच्या संवादाची जिल्ह्यात चर्चा

सतेज- मुश्रीफांची टोलेबाजी; अमल महाडिक यांचे स्मितहास्य, जिल्हा बँकेतील नेत्यांच्या संवादाची जिल्ह्यात चर्चा

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत आमदार अमल महाडिक यांच्या सोबत तुमची वरचेवर भेट होते, पण मला वेळ देत नाही, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा चिमटा काढला. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी या भेट म्हणजे बदलत्या राजकारणाची ही नांदी असल्याचे वक्तव्य केले. पण, या दोन्ही नेत्यांतील संवाद अगदी शांतपणे ऐकून घेत यावर, अमल महाडिक यांनी केवळ स्मितहास्यच केले.

'गोकुळ'च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांना बाजूला ठेवून पॅनेलची रचना करु असा आग्रह भाजपच्या स्थानिक नेत्यांचा होता, त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुती म्हणून सामोरे जाण्याचा तयारी दाखवली असली तरीही संघाच्या कारभाराच्या चौकशीचा मागे लागलेला ससेमिरा त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील सबंध ताणले गेले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी 'गोकुळ'मध्ये सत्तेत असलेल्या महायुतीतील नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे एकीकडे हे सुरु असताना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सतेज पाटील, मुश्रीफ यांच्यामधील अमल महाडीक यांच्या समोर रंगलेल्या टोलेबाजींची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

मुश्रीफ-सतेज यांच्यात चर्चा

दोन्ही नेत्यांमधील संवाद व त्यानंतर झालेल्या भेटीमागे 'गोकुळ'च्या राजकारणाची किनार आहे. संचालक मंडळाची मुदत संपत आहे, भाजपने सत्तारुढ गटाच्या भोवती टाकलेले फासे आणि त्यातून कशा प्रकारे बाहेर पडायचे? याबाबत चर्चा झाल्याचे समजते

दोन मिनिटे मागितली, दिली दहा मिनिटे

सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे चर्चेसाठी केवळ दोन मिनिटे द्या, असे सांगितले. मात्र, टोलेबाजीनंतर दोन्ही नेत्यांत तब्बल दहा मिनिटे चर्चा झाली.

Web Title : सतेज-मुश्रीफ की नोकझोंक से महादिक खुश; जिला बैंक की चर्चा कोल्हापुर में।

Web Summary : सतेज पाटिल ने मुश्रीफ को महादिक से मिलने पर छेड़ा, जिससे राजनीतिक अटकलें तेज हो गईं। महादिक की मुस्कान के साथ उनकी चर्चा, सत्तारूढ़ समूह पर भाजपा के दबाव के बीच 'गोकुल' चुनाव रणनीति की बात को बढ़ाती है।

Web Title : Satej-Mushrif banter amuses Mahadik; district bank talk sparks Kolhapur buzz.

Web Summary : Satej Patil playfully teased Mushrif about meeting Mahadik, sparking political speculation. Their discussion, observed by Mahadik's smile, fuels 'Gokul' election strategy talks amidst BJP's pressure on the ruling group.