शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत १४० जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी कडक कारवाई केली. यामध्ये तिन्ही पोलीस ठाण्याने एकूण १४० जणांवर कारवाई केली, तर गावभाग पोलीस ठाण्यात ८४ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहर व परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करत फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरुवात केली. सलग तिसऱ्या दिवशी कडक कारवाई करत गावभाग ८४, शिवाजीनगर ३१ व शहापूर २५ अशा एकूण १४० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. गावभाग पोलिसांनी ८४ जणांची अँटिजन चाचणी केली. यामध्ये तीनजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णांना मुसळे हायस्कूल येथील विलगीकरण कक्षात पाठवले आहे.

फोटो ओळी

१८०५२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली.

छाया-उत्तम पाटील