जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : सांगली-कोल्हापूरमहामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) बायपासवर मंगळवारी (दि. १२) दुपारी ३ वाजेच्या सुमारास पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात टँकरमधील सुमारे १० हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक रोखली होती.
मिरज येथील डेपोतून पेट्रोल भरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा हा टँकर उदगाव बायपास मार्गावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने तो अचानक रस्त्यावर आडवा झाला. टँकरच्या वरच्या भागातून पेट्रोलची वेगाने गळती सुरू झाली होती. परिसरात उग्र वास पसरल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
धोका टाळण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने बायपासवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवली. महामार्गावरील सर्व वाहने जयसिंगपूर शहरांतर्गत मार्गावरून उदगावच्या दिशेने वळवण्यात आली. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या वाहनांना पाचारण केले होते.
बायपास बंद करून वाहतूक शहरातून वळवल्यामुळे जयसिंगपूर-उदगाव मुख्य मार्गावर अवजड वाहनांची मोठी गर्दी झाली. सुमारे तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांच्या इंधनाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने टँकर उभा करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते.
Web Summary : Near Udgaon, a tanker overturned, spilling 10,000 liters of petrol. Traffic halted on the Sangli-Kolhapur highway. No injuries occurred, but substantial fuel loss resulted. Authorities worked to clear the area, causing traffic delays for hours.
Web Summary : उदगांव के पास एक टैंकर पलटने से 10,000 लीटर पेट्रोल फैल गया। सांगली-कोल्हापुर राजमार्ग पर यातायात बाधित। कोई घायल नहीं, लेकिन ईंधन का भारी नुकसान। अधिकारियों ने क्षेत्र को साफ करने का काम किया, जिससे घंटों यातायात बाधित रहा।