शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘पेशावर’ हल्ला; कोल्हापुरात हळहळ

By admin | Updated: December 18, 2014 00:01 IST

विद्यार्थ्यांनी वाहिली आदरांजली : मानवी साखळी, कँडल मार्च

  कोल्हापूर : पेशावरमधील सैनिकी शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मानवी साखळीद्वारे निषेध, तर कँडल मार्चच्या माध्यमातून या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आज, बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. कोल्हापुरातील सर्व स्तरातील व्यक्ती, संस्थांनी या कृत्याचा निषेध केला. अनेक घरांसह विविध शाळा, संस्थांमध्ये या हल्ल्याबाबत हळहळ व्यक्त झाली. एरवी पाकिस्तान म्हटले की, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, अशी आक्रमक भाषा वापरणाऱ्या समाजाने आज देश, प्रांत, धर्माच्या भिंती तोडून या मानवतेवर, माणुसकीवर झालेल्या हल्ल्याबद्दल वेगळ्या संवेदना जागवल्या. सकाळी विविध शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी आदरांजली वाहण्यात आली. शिवाय विविध सामाजिक संस्थांनी या हल्ल्याचा निषेध केला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’ , ‘दहशतवाद्यांचा निषेध असो...’ अशा घोषणा देत मुस्लिम बोर्डिंग, नेहरू हायस्कूल, पद्माराजे हायस्कूल आणि ४०व्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हल्ल्याचा जाहीर निषेध केला. दसरा चौकात दुपारी दोन वाजता मानवी साखळी करून या घटनेबाबत भावना व्यक्त केल्या. शिवाय हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुला-मुलींना आदरांजली वाहण्यात आली. दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, पाकिस्तानने जसे पेरले, तसे उगवले आहे. यापुढे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने दबावगट निर्माण करावा. यावेळी प्रशासक कादर मलबारीसुपरिटेंडेट हाजी शौकत मुजावर, उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक हाजी लियाकत मुजावर, नगरसेवक जहाँगीर पंडत, अकबर शेख, हमलेखान शिंदी, साजिद खान, हाजी मुसा पटवेगार, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, आदी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता बिंदू चौकात विविध संघटनांनी कँडल पेटवून श्रद्धांजली वाहिली. यात ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, जनस्वास्थ्य दक्षता समितीचे सुरेश शिपूरकर, ‘जीवनमुक्ती’चे अशोक रोकडे, ‘एकटी’च्या शरयू भोसले, आर. वाय. पाटील, प्रिया चोरगे, अतुल देसाई, संजय देशपांडे, जैन्नुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते. साडेसात वाजता अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे शाहूपुरीतील वि. स. खांडेकर भाषाभवन ते दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मार्गावर कँडल मार्च काढण्यात आला. यात मंडळाचे अध्यक्ष बाबूराव मुळीक, हसन देसाई, वंदना काशीद, हिम्मतराव साळुंखे, बी. बी. मगदूम, विनय पाटगावकर, आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) धरती भी तुम्हारी, हथियार भी तुम्हारे... ‘खून के नापाक ये धब्बे, खुदा से कैसे छिपाओगे? मासूमों के कब्र पर चढकर, कौन से जन्नत जाओगे?, कल धरती हमारी थी, हथियार तुम्हारे थे आज धरती भी तुम्हारी है हथियार भी तुम्हारे है, हमे दु:ख कल भी था आज भी’, अशा शायरी नेहरू हायस्कूलच्या आस्मा कुरणे, उमरा रंगरेज, सना मोमीन यांनी मानवी साखळीवेळी सादर केल्या. सोशल मीडियावर हळहळ ‘दे वेन्ट टू स्कूल अ‍ॅण्ड नेव्हर कमबॅक’ अशा शब्दांत तसेच तालिबानी हल्ला निषेधार्थ आहे. त्याबाबत निषेध व्यक्त करून सर्व जात, धर्म आणि जग हे दहशवादाविरोधात एकजूट असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन करणारे विविध स्वरूपातील संदेश दिवसभर व्हॉटस् अप, फेसबुकवरून फिरत होते. हल्ल्याबाबत हळहळ व्यक्त होत होती. पेशावरमधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरात बुधवारी मुस्लिम बोर्डिंग, नेहरू हायस्कूल, पद्माराजे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी, तर सायंकाळी बिंदू चौकात अवनि, जनस्वास्थ दक्षता समिती,आदींनी आदरांजली वाहली.