Kolhapur News: मिरवणुकीस परवानगी नाकारली, वाघापूर येथे ग्रामस्थांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:50 IST2026-05-16T17:50:09+5:302026-05-16T17:50:30+5:30

पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला

Permission denied for procession, villagers protest in Waghapur kolhapur district | Kolhapur News: मिरवणुकीस परवानगी नाकारली, वाघापूर येथे ग्रामस्थांचा ठिय्या

Kolhapur News: मिरवणुकीस परवानगी नाकारली, वाघापूर येथे ग्रामस्थांचा ठिय्या

वाघापूर : वाघापूर (ता. भुदरगड) येथील छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (दि.१५) पोलिस प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारल्याने गावातील युवकांनी उत्सव मंडपासमोरच ठिय्या मारून आंदोलन केले. त्यामध्ये युवकांबरोबर महिलांचीही गर्दी होती. गावामध्ये तणावाचे वातावरण होते.

सुमारे दोन तास ग्रामस्थांनी ठिय्या मारूनदेखील याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिसांच्या मनमानी कारभाराचा गावच्यावतीने निषेध करण्यात आला. पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

रात्री अकरापर्यंत या घटनेवर काहीही निर्णय न झाल्याने युवकांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता डॉल्बीच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्याचा इशारा दिला आहे. जातीय तेढ निर्माण होऊ नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी मागणाऱ्यांना लेखी उत्तर दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी दिली.

Web Title : कोल्हापुर: जुलूस की अनुमति नहीं; वाघापुर में ग्रामीणों का विरोध

Web Summary : कोल्हापुर के वाघापुर में छत्रपति संभाजी महाराज जयंती जुलूस की अनुमति पुलिस ने नहीं दी, जिसके बाद ग्रामीणों ने विरोध किया। ग्रामीणों ने धरना दिया और पुलिस पर मनमानी का आरोप लगाया। युवाओं ने शनिवार शाम जुलूस निकालने की धमकी दी।

Web Title : Kolhapur: Procession Denied; Villagers Protest in WaghaPur

Web Summary : Waghapur villagers protested after police denied permission for Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti procession. Tensions rose as villagers staged a sit-in, accusing police of high-handedness. Youths threaten to hold procession Saturday evening.