शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

Fuel Shortage: म्हणे 'ईव्ही' वापरा..कोल्हापुरात शासकीय ताफ्यात एकच वाहन

By भीमगोंड देसाई | Updated: May 15, 2026 18:14 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस, अधिकाऱ्यांना एसटीने प्रवास करावा लागणार

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शासकीय ताफ्यात सध्या एकच ईव्ही कार आहे. इतर विभागांत पेट्रोल, डिझेलची वाहने आहेत. बाह्यस्रोत एजन्सीकडेही तातडीने ईव्ही वाहने उपलब्ध नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नाही. जिल्ह्यात अशी स्थिती असल्याने अधिकाऱ्यांसमोर काटकसरीच्या शासन आदेशाचे तंतोतंत पालन करताना धर्मसंकट उभे राहणार असल्याची भावना अनेक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याच्या अनुषंगाने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी १९ मुद्द्यांच्या आधारे परिपत्रक काढले. जिल्हा पातळीवरील बहुतांशी शासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यातील अनेक नियम गतिमान युगात प्रत्यक्षात पाळणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाचा आदेश असल्याने अधिकारी खुलेआम विरोध करत नाहीत आणि बोलतही नाहीत, अशी स्थिती आहे.

सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन नसल्याने कोंडी

अलिकडे ईव्ही वाहने घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारीही स्वत: अशी वाहने खरेदी करत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी कार्यालयात आणि इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन नाहीत. जिल्हा परिषद, मध्यवर्ती शासकीय इमारत, महापालिकेत काही ईव्ही दुचाकीधारकांना नाईलाजास्तव धोकादायकरित्या चार्जिंग लावावे लागत आहे. यामुळे किमान प्रत्येक पेट्रोल पंपावर तरी तातडीने चार्जिंग स्टेशन उभारावे, अशी मागणी होत आहे.

बसने जाणार कसे...

जिल्ह्यात सगळीकडे वेळेवर बसची व्यवस्था नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याने आठवड्यातून एकदा बसने प्रवास करणे, बोजवारा उडालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून कार्यालयीन कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दौरे करणे हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांसमोर आव्हान

पोलिस विभागाने कोणत्याही प्रयोजनासाठी दुचाकी किंवा इतर वाहनांच्या मिरवणुका, वाहनांच्या ताफ्यांना परवानगी देऊ नये, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र वाहनांची मिरवणूक काढणारे प्रभावशाली राजकीय पुढारी, पक्ष, संघटना असतात. त्यांना परवानगी नाकारण्याचे धाडस पोलिस प्रशासन करणार का? याचे उत्तर आगामी काळातच सामान्य लोकांना मिळणार आहे.

शासकीय खर्चात काटकसर करायची असेल तर शासनाची अनावश्यक वाहन फिरती पूर्णपणे बंद केली पाहिजे. काही अधिकारी सुट्टीच्या दिवशीही वाहने फिरवतात. त्याच्यावर पूर्णपणे निर्बंध आणले पाहिजेत. पुणे, मुंंबईला एकाच वाहनातून विविध विभागांचे अधिकारी एकत्र गेले पाहिजेत. मात्र, सध्याच्या शासनाच्या नियमावलीत काही मुद्द्यांची अंमलबजावणी करणे शक्य नाही. त्याचा फेरविचार झाला पाहिजे. - अनिल लवेकर, राज्य संघटक, मध्यवर्ती शासकीय कर्मचारी संघटना
 

शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा सल्ला शासन देत आहे. असे केल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले तर त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. नैसर्गिक, जैविक, सेंद्रिय खते वापरा, असे सांगितले जात आहे. पण ही खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. आहेत त्यात बनावटगिरी आहे. सेंद्रिय खत म्हणून माती विकली जाते. - माणिक शिंदे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Shortage: Use EVs, but Kolhapur has only one!

Web Summary : Kolhapur faces challenges implementing fuel-saving directives. Limited EV infrastructure and inadequate public transport hinder compliance. Officials express concerns about practicality. Police face pressure regarding vehicle procession permits.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर