शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नाराजी शमविण्याचा नवा प्रयोग, सव्वा वर्षाचा स्वीकृत नगरसेवक; भाजप, काँग्रेस, शिंदेसेनेकडून कुणाला संधी..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:22 IST

तीन पक्षांकडून आठ अर्ज, शुक्रवारी होणार निवड

कोल्हापूर : स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्याच नावाचा विचार व्हावा, यावरून कार्यकर्त्यांत निर्माण झालेला असंतोष शमविण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी पाच वर्षांवरून पंधरा महिन्यांवर आणण्याची वेळ भाजपसह काँग्रेस, शिंदेसेना यांच्यावर आली आहे. भाजपने प्रथम हा निर्णय घेतला आणि पाठोपाठ काँग्रेसनेसुद्धा तसाच निर्णय घेतला. मंगळवारी स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेत आठ जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडीवर शुक्रवारी सकाळी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत औपचारिकपणे शिक्कामोर्तब केले जाईल.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर यांच्या निवडीनंतर गटनेत्यांची निवड झाली. विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर यांची निवड काँग्रेसने केली असून, तसे पत्र महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात आले. परंतु, महापौरांनी आयुक्तांकडे अद्याप तशी शिफारस केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निवडीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळी ११:०० ते दुपारी २:०० यावेळेत भाजपकडून तीन, काँग्रेसकडून तीन, तर शिंदेसेनेकडून दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी हे अर्ज स्वीकारले.

तीन्ही पक्षांकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कमालीचा आग्रह धरला होता. त्यामुळे नावांवर एकमत करणे, नेते मंडळींना काहीसे कठीण जात होते. इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. जेंव्हा नावे जाहीर करण्यात आली तेंव्हा तर अन्य इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळे ‘स्वीकृत’साठीचा पाच वर्षांचा कालावधी कमी करून तो सव्वा वर्ष करण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागली. भाजपने तसा निर्णय घेताच पाठोपाठ काँग्रेस पक्षानेही घेतला. त्यामुळे आता नाराज झालेल्या इच्छुकांना पुढे संधी मिळणार असल्याने ही नाराजी शमविण्यात नेते यशस्वी झाले.

कुणाकडून कुणाला संधी?

भाजप : प्रा. जयंत पाटील, महानगर अध्यक्ष विजय जाधव, सुनील वाडकर
काँग्रेस : सुनील मोदी (उद्धवसेना), राहुल माने, मुस्ताक मलबारी
शिंदेसेना : रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण शुक्रवारी आयुक्त करणार शिफारस.

शुक्रवारी होणार निवड

शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असून, त्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आज दाखल झालेल्या अर्जानुसार आयुक्त के. मंजुलक्ष्मी या महासभेसमोर या नावांची शिफारस करतील, त्यानंतर एकमताने या निवडी झाल्याचे महापौर रुपाराणी निकम जाहीर करतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: New tactic to quell dissent; nominated corporator for short term.

Web Summary : Kolhapur parties reduce nominated corporator terms to quell dissent. BJP, Congress, and Shinde Sena nominate candidates. The decision aims to appease disgruntled members with future opportunities after initial disagreements.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे