शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

भीती मोडलीच..ना सॅनिटायझेशन, ना दारावर स्टीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर गेल्या वर्षी एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेची यंत्रणा त्या भागात ...

कोल्हापूर गेल्या वर्षी एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेची यंत्रणा त्या भागात दाखल होत होती. सॅनिटायझेशन केले जात होते. काठ्या लावून तो परिसर बंदिस्त केला जात होता. संबंधिताच्या घरावर स्टीकर लावले जात होते. पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार केली जात होती. पीपीई किटमधून आलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ही माहिती गोळा करून तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला सुरुवात होत होती; परंतु आता यातील फारसे काही होतच नाही. प्रशासन आणि आरोग्य विभाग शिथिल झाल्यामुळे नागरिकही बेताल झाल्याचे चित्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. पुन्हा पूर्वीसारखी कडक अंमलबजावणी केली नाही आणि घरात रुग्ण ठेवण्यावर बंधने आणली नाही तर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही स्थिती नियंत्रणात आहे; परंतु त्याआड जे काही चाललं आहे त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात कशा पद्धतीने सध्या ‘आवो जावो घर तुम्हारा’ चालले आहे, याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे....

१. हे आहेत प्रशासनातील एका महत्त्वाच्या खात्यातील अधिकारी. त्यांनी बुधवारी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब चाचणी केली. गुरुवारी त्यांचा स्वॅब पाॅझिटिव्ह आला. त्यांनी याबाबत अपार्टमेंटमधील कुणालाही कल्पना दिली नाही. ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. घरातून त्यांना डबा जातो. त्यांच्या घरात धुण्या, भांड्यासाठी येणारी कामवाली बाई इतर घरातही जाते. इकडे ना महापालिकेचे कुणी आले, ना कुणी दारावर स्टीकर लावले.

२. या महिला आहेत निमशासकीय कर्मचारी. पन्हाळा तालुक्यातील खेडेगावात त्या राहतात. रविवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘अहवाल पॉझिटिव्ह येवू दे; परंतु तुम्ही या चाचण्या करून या.’’ त्या पॉझिटिव्ह आलेल्या महिला कर्मचारी चाचण्या करण्यासाठी खेडेगावातून कोल्हापुरात लॅबमध्ये येवून बसल्या.

३. नृसिंहवाडीत एकाच घरातील ११ जण पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच सांगितले. पहिल्या आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णानंतर तेथील यंत्रणा सक्रिय झाली नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

चौकट

भीती दाखवू नका, पण

गेल्यावर्षीसारखा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर सायरन वाजवत रुग्णवाहिका येत होत्या. त्याला घेऊन जात होत्या. यातील आता काहीच होत नाही. एवढी भीती दाखवायची गरज नाही; परंतु एखाद्या घरातील, अपार्टमेंटमधील नागरिक पॉझिटिव्ह आला असेल तर ते किमान कळत होते. नागरिक काळजी घेत होते. आता यातील काहीच होत नाही. भीती दाखवू नका; पण कुठे कोण पॉझिटिव्ह आले ते कळले तर किमान इतर लोक दक्षता घेतील.

चौकट

पुण्याची पुनरावृत्ती कोल्हापुरात नको

पुण्यात लक्षणे नसलेला रुग्ण घरातच ठेवण्यास परवानगी दिली गेली आणि शिस्त कोणीच पाळली नाही. परिणामी, आख्खेच्या आख्खे अपार्टमेंट पॉझिटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर शहरामध्ये इतके आणि उर्वरित बारा तालुक्यात इतके पॉझिटिव्ह नागरिक घरामध्ये वास्तव्यास आहेत. घरी वास्तव्यास असताना सगळीकडेच आवश्यक काळजी घेतलीच जाते असे नाही. त्यामुळे या पर्यायाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे.