शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही परराज्यातील मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 19:40 IST

CoronaVirus Kolahpur : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या संचारबंदीमुळे रोजगार नसल्याने कोल्हापूरमधील परराज्यांतील मजूर, कामगार आपल्या गावांना जात आहे. सुमारे १२०० जण गुरूवारी ह्यकोल्हापूर-धनबादह्ण रेल्वेने गेले. कोल्हापूर-गोंदिया या महाराष्ट्र एक्सप्रेसने शुक्रवारी सुमारे तीनशे मजूर रवाना झाले.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही परराज्यातील मजूर रवानाकोल्हापूर-धनबादने जाण्याची तयारी

 कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या संचारबंदीमुळे रोजगार नसल्याने कोल्हापूरमधील परराज्यांतील मजूर, कामगार आपल्या गावांना जात आहे. सुमारे १२०० जण गुरूवारी ह्यकोल्हापूर-धनबादह्ण रेल्वेने गेले. कोल्हापूर-गोंदिया या महाराष्ट्र एक्सप्रेसने शुक्रवारी सुमारे तीनशे मजूर रवाना झाले.संचारबंदी लागू असल्याने उद्योग,बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. रोजगार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी वाढेल या भीतीने उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथून आलेले कामगार आपआपल्या गावांना जात आहेत.

महाराष्ट्र एक्सप्रेस ही शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून निघाली. त्यातून परराज्यांतील सुमारे तीनशे मजूर रवाना झाले. या रेल्वेतून जाण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून हे कामगार रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. कोल्हापूरमधून दर गुरूवारी रात्री कोल्हापूर-धनबाद रेल्वे रवाना होते. त्याव्दारे गया (बिहार) पर्यंत झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमधील हे मजूर जातात. आता कोल्हापुरातील उर्वरीत परराज्यातील काही मजूरांनी पुढील आठवड्यातील कोल्हापूर-धनबाद रेल्वेने जाण्याची तयारी केली आहे. कुटुंबासहीत असलेले काही मजूरांनी मात्र, कोल्हापूरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगारrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर