शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘बोलेमामांचा वडापाव’ राखणार नाव!--चारही मेहनती मुली सरसावल्या :

By admin | Updated: September 11, 2014 23:13 IST

कोसळलेल्या भिंतीखाली दबलेलं स्वप्न मागतंय फक्त सातारकरांचा हात--लोकमत इनिशिएटिव्ह---संपर्क : 9850384376

सातारा : कोसळलेल्या भिंतीखाली गाडलेली कढई माती झटकून पुन्हा आगीवर स्वार व्हायला आतुरलीय. विसर्जनाच्या रात्री ढिगाऱ्याखाली बोलेमामांच्या छातीवर आडवा सापडलेला सिलिंडर पुन्हा उभा राहतोय. मामांच्या एकाहून एक जिद्दी अशा चार मुली ‘बोलेमामांचा वडापाव’ हे सातारकरांच्या जिभेवर कोरलेलं नाव राखायला सरसावल्यात. फक्त गरज आहे ती उत्सवी जल्लोषानंतर निद्रिस्त झालेली सातारकरांची संवेदना जागृत होण्याची. नाव: चंद्रकांत भिवा बोले. वयाच्या ६४ व्या वर्षी एक कप चहा देण्यासाठी चाळीस पायऱ्या चढणारा कष्टाळू माणूस. पत्नी सुनंदा यांच्यासह गीता, वैशाली, नीता आणि हेमांगी या चार मुलींचा एकमेव आधार. दिवसभर कॅन्टीन चालवून शे-दीडशेच हाती पडतात म्हणून संध्याकाळी न थकता वडापावची गाडी लावणारा. अपार मेहनतीतून मुलींना शिक्षण देणारा. पंधरा दिवस व्यवसाय बंद राहील, या धास्तीनं मोतिबिंदूचं आॅपरेशन कायम पुढं ढकलत राहणारा. सकाळी सातला घराबाहेर पडून १६ तास मेहनत करून रात्री अकराला घरी परतणारा हा आदर्श पिता सोमवारी रात्री मुलींच्या डोळ््यादेखत राजपथावर कोसळलेल्या भिंतीने गिळून टाकला.मुलींच्या डोळ्यातलं पाणी आटत नाही. ‘कशाचीही काळजी न करता फक्त शिका,’ असं म्हणणाऱ्या पित्याच्या आठवणी सांगून संपत नाहीत. पित्याला ओढून नेणारी काळरात्र तर सेकंदा-सेकंदानं आठवत राहते. पोलिसांनी दमदाटी करून वडापावची गाडी धोकादायक भिंतीजवळ उभी करणं कसं भाग पाडलं, आदल्या दिवशी याच प्रकारामुळं गांगरलेल्या बोलेमामांच्या हातून बेसनपिठाचं पातेलं कसं पडलं होतं, भिंत हादरू लागताच ‘डॉल्बी बंद करा’ म्हणून फोडलेला टाहो कुणालाच कसा ऐकू गेला नाही, भिंत कोसळल्यावर पित्याच्या बचावासाठी मिरवणुकीतल्या बाप्पांच्या मूर्तीपुढेच आपण कसा हात पसरला, हे सांगताना वैशालीचा गळा दाटून आला. सगळ्या मुली ग्रॅज्युएट. धाकटी हेमांगी तर एमबीए करतेय. चौघींपैकी दोघी विवाहित. आईला गुडघेदुखीचा त्रास. पण या चारही बहिणींना पुन्हा कष्टानं उभारी घ्यायचीय. ‘बोलेमामांचा वडापाव’ हे पित्यानं कमावलेलं नाव राखून त्याचं स्वप्न साकार करायचंय. (प्रतिनिधी)कुठे गेली होती संवेदनशीलता?४डॉल्बीच्या थयथयाटाने रस्त्यावरच्या चेंबरचे लोखंडी झाकणसुद्धा जोरजोरात हलत होतं.४भिंत कोसळल्यावरही पोलीस घटनास्थळी येईपर्यंत समोरच्या डॉल्बीचा दणदणाट सुरूच होता. ४‘इथे आमचे वडील आहेत,’ असे मामांच्या मुली ओरडून सांगत असतानाही ढिगाऱ्यावर त्याच ठिकाणी उभे राहून काहींनी फोटो काढले.४बुधवारी पालिकेने इमारत पाडल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेली वडापावची गाडी जेव्हा दिसू लागली, तेव्हा एकाने ती चोरण्याचा प्रयत्न केला.सातारकरांनो चला, भरपाई करूया !गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना भिंत कोसळण्याच्या घटनेस जबाबदार कोण, यावर मंथन सुरू आहे आणि तपासही. परंतु दुर्घटनेची जबाबदारी निश्चित होवो न होवो, बोलेमामांच्या कष्टाळू मुलींना मानसिक उभारी आणि आर्थिक पाठबळ देणं ही संवेदनशील सातारकरांची सामूहिक जबाबदारी आहे. चला, उत्सवाच्या जल्लोषात आपल्यापैकीच काहीजणांच्या हरवलेल्या संवेदनशीलतेची भरपाई सारे मिळून करू या. गणेश विसर्जनाच्या दिवशी वडापावचा व्यवसाय जोरात झाल्यामुळं चंद्रकांत बोले यांच्या खिशात चार ते पाच हजारांची रोकड जमा झाली होती. एटीएम, आधारकार्डही खिशातच होतं. मात्र, शवविच्छेदनानंतर आम्ही मामांचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा पँटचे दोन्ही खिसे उलटे होऊन बाहेर आले होते... आत काहीच नव्हतं.- वामन बोले, चंद्रकांत यांचे बंधू