शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरोत्थान’ टक्केवारीत अडकला

By admin | Updated: January 20, 2015 00:56 IST

नियोजनचा खोडा : महापालिकेत देता, आम्हाला का नाही..?

कोल्हापूर : शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून मंजूर केलेला निधी जिल्हा नियोजन विभागातील एका अधिकाऱ्यामुळे अडकून पडला आहे. महापालिकेत तुम्ही प्रत्येक कामाला पैसे देता, मग इथे दिले म्हणजे काय झाले, अशी मागणी त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे होत असल्याचे जबाबदार सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दोन वर्षांचा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागात पडला आहे.राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेसाठी जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून २०१३-१४ साली २ कोटी २५ लाख व २०१४-१५ साठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तेवढाच हिस्सा महापालिकेने घालायचा आहे. त्यातून रस्ते, गटारींसह विविध स्वरुपांची कामे झाली आहेत. त्याचा पहिल्या वर्षाचा ५७ लाखांचा निधी व दुसऱ्या वर्षाचा ४ कोटी ४९ लाखांचा निधी शासनाने वितरीत केला आहे. हा निधी थेट महापालिकेला न येता तो जिल्हा नियोजन विभागाकडून वितरीत होतो. कारण नियोजन मंडळातर्फेच ही कामे शासनाला सादर झालेली असतात. कामे तरी झाली आहेत, निधीही प्राप्त झाला आहे; परंतु तो नियोजन विभागातून पुढे सरकत नसल्याने त्याची अधिक चौकशी केल्यावर हा निधी एका टेबलला अडवला असल्याचे समजले. निधी लवकर मिळावा म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला पण तो पुढे सरकेना. मग ज्यांनी नगरोत्थानमधील कामे केली आहेत, असे कंत्राटदार जावून थेट साहेबाला भेटले. तिथे पूर्वी महापालिकेत हंगामी कामगार असलेला एक लिपिक म्हणून रुजू झाला. त्यालाही सगळ््यांनी विनंती केली. (प्रतिनिधी)लाख नको, टक्का द्याकामाचे पैसे निघावेत म्हणून कंत्राटदारांनी वर्गणी काढून लाख रुपये लिपीकास द्यायचे निश्चित केल्याचे त्यांना कळविले; परंतु एवढ्यावर भागेना. उलटा निरोप दिला की, लाख नकोत, एक टक्का द्या. त्यामुळे कंत्राटदारांनीही तिकडे जाणेच बंद केले आहे. काहीजण यासंबंधी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे समजते.