शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेने तोडफोड करण्यापेक्षा मोर्चे काढावेत : चंद्रकांतदादा

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

‘एफआरपी’ न देणाऱ्यांची गोदामे सील करण्याचा इशारा

कोल्हापूर : ऊसदराबाबत कायद्याच्या चाकोरीत राहून कारवाई सुरू आहे. उद्या, मंगळवारपासून कारखान्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांशी आयुक्त चर्चा करणार असून, ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांची साखरेची गोदामे सील करून शेतकऱ्यांचे पैसे भागवू, असा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला. शेतकरी संघटनांनी ऊसदरासाठी आक्रमक भूमिका घ्यावी; पण शासकीय कार्यालये टार्गेट करू नयेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘एफआरपी’बाबत विभागीय आयुक्तांनी कारखान्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावर त्यांचे म्हणणे घेतले आहे. आता आयुक्तांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावर उद्यापासून दररोज कारखान्यांच्या प्रतिनिधींना बोलावूनघेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. तोपर्यंत पैसे नाहीच दिले तर साखरेची गोदामे सील करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यास आम्ही बांधिल आहोत. परंतु, तशी वेळ येणार नाही. घाई-गडबडीने घेतलेले निर्णय न्यायालयात टिकत नसल्याने कायद्याच्या चौकटीत बसून कार्यवाही सुरू आहे. कोल्हापुरातील कारखाने ओढाताण करून पैसे देतात, मग सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांतील कारखान्यांना काय होते? अशी विचारणाही मंत्री पाटील यांनी केली. ऊसदराबाबत आंदोलन करणे शेतकरी संघटनेचा हक्क आहे. मोर्चे, उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणा; पण शासकीय कार्यालयांचे नुकसान करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

कोंडी कराल,
तर थेट कारवाई!
दोन्ही कॉँग्रेस कारखानदार असल्याने ‘एफआरपी’ न देऊन सरकारची कोंडी करीत आहेत का? या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, कोंडी करण्याचे हे मैदान नाही. विरोधकांना कोंडी करायची असल्यास खुल्या मैदानात यावे. कोंडी करण्याचे धाडस कोणी करीत असेल, तर थेट कारवाई केली जाईल.



मूल्यांकन पारदर्शकच
बाजारातील साखरेच्या दरावरच शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यांकन ठरविले जाते. यासाठी ‘एफआरपी’ अर्थसाहाय्य योजनेचा प्रस्ताव होता; पण यामध्ये संचालकांना बांधून घेतले जाणार असल्याने ही योजना स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती राज्य बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दिली.