‘वेंकटेश्वरा गुड्स’ला वाहतुकीपोटी दिलेल्या १३५ कोटींचा हिशेब द्या, दूध संस्थांची ‘गोकुळ’ प्रशासकीय मंडळाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 19:12 IST2026-05-12T19:12:22+5:302026-05-12T19:12:47+5:30
निष्पक्षपाती काम करा

‘वेंकटेश्वरा गुड्स’ला वाहतुकीपोटी दिलेल्या १३५ कोटींचा हिशेब द्या, दूध संस्थांची ‘गोकुळ’ प्रशासकीय मंडळाकडे मागणी
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे दूध ‘कोल्हापूर’ व ‘शिरोळ’ येथून वेंकटेश्वरा गुडस मूव्हर्स या कंपनीच्या माध्यमातून मुंबई, पुण्याकडे पाठवले जाते. ही कंपनी अनेक दिवसांपासून हे काम करत असून कंपनीला आतापर्यंत सुमारे १३५ कोटींहून अधिक रक्कम अदा केली आहे. त्याचा हिशेब द्या, अशी मागणी सांगरुळ (ता. करवीर) येथील जय हनुमान दूध संस्थेचे बाळासाहेब बापू खाडे यांनी प्रशासकीय मंडळाकडे केली.
‘गोकुळ’ दुधाची मुंबई व पुणे येथे वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या ठेक्याची माहिती मिळावी, यासाठी करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले येथील दूध संस्था प्रतिनिधींनी सोमवारी प्रशासकीय मंडळाची भेट घेतली.
एकटे लढायचे हे ध्यानात घेऊन तयारीला लागा - सतेज पाटील
युवराज पाटील दूध संस्था मौजे सांगाव (ता. कागल) चे विजयसिंह पाटील म्हणाले, या वाहतूक कंपनीला कधीपासून ठेका दिला, वाहतुकीपोटी दिलेले पैसे नेमके कुठे गेले आहेत? टँकरची संख्या किती होती, त्यावेळी वाहतुकीचा दर किती होता? याची वर्षनिहाय माहिती द्या. प्रशासक म्हणून निष्पक्षपाती काम करा.
मागणीचे निवेदन प्रशासकीय मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर यांना दिले. यावेळी, के. के. चौगले, दत्तात्रय पाटील, राहुल आळवेकर, कृष्णात मेटील, निवास पाटील, दिंगर बाटे, विष्णुपंत खाडे आदी उपस्थित होते.
‘के. पी- ए. वाय.’ एकत्र येतात तर मग ‘बंटी-महाडिक’ का नाही?; सतेज पाटील यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
‘वेंकटेश्वरा’ला थ्रो पास कसा?
वेंकटेश्वरा गुडस मूव्हर्स या कंपनीच्या टँकरना इतर टँकरप्रमाणे दूध वाहतुकीचे नियम होते का? या कंपनीच्या टँकरमधून गेलेले दूध ‘थ्रो’ पासद्वारे उतरून घेतले जात होते, याचीही माहिती सभासदांना मिळाली पाहिजे, अशी मागणी भगवान दिंडे यांनी केली.
घरच्यांना फाशी अन्..
ज्याचे एक लिटर दूध नाही, अशी मंडळी येऊन येथे पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत आहेत. चुकीचे आरोप करून वातावरण बिघडू देऊ नका, येथे शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून आपली आहे. कोणाचे तरी ऐकून ‘घरच्यांना फाशी अन् बाहेरच्यांना आहेर देऊ नका’, असा इशाराही संस्था चालकांनी दिला.