शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूरच्या जवानास साश्रुनयनांनी निरोप

By admin | Updated: January 10, 2015 00:50 IST

हजारोंची उपस्थिती : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गडहिंग्लज : लिंगनूर, कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे ‘अमर रहे..अमर रहे..सुनील जोशीलकर अमर रहे..!’च्या घोषात हजारो अबालवृद्धांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. गावाच्या बेघर वसाहतीजवळील माळावर शासकीय इतमामात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चुलतभाऊ अमोलने भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.सुनील यांचा जम्मू-काश्मीर येथील डिगडोल येथे सेवा बजावत असताना अंगावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत बुधवार (दि. ७) रोजी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव आज दुपारी तीनच्या सुमारास गावात आणण्यात आले. दरम्यान, गडहिंग्लजमधील विविध शाळांतील मुलांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून श्रद्धांजली वाहिली.
गावच्या वेशीपासून ते घरापर्यंत फुलांनी सजविलेल्या मोटारीतून पार्थिव आणण्यात आले. पार्थिव घराजवळ येताच नातेवाईकांना केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नातेवाईकांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सैन्यदलासह एन.सी.सी.च्या मुलांनीही यावेळी संचलन केले. (वार्ताहर)

मान्यवरांकडून पुष्पचक्र अर्पण
पालकमंत्री व सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, तहसीलदार हनुमंतराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह जाधव, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जी. टी. पोवार, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पं. स. सभापती अनुसया सुतार, सरपंच काशीनाथ कांबळे, आदींसह सैन्यदलातील कर्नल रॉक, सुभेदार बाबू नाईक, सुभेदार कोडेकर, कर्नल अ‍ॅलेक्स मोहन, आदींनी श्रद्धांजली वाहिली.

नियतीचा कू्रर खेळ अन् योगायोग
सुनीलची गर्भवती पत्नी संध्या हिला शुक्रवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ‘मुलगा’ झाला.
सलोनी व सई या दोन मुलीनंतर जन्मलेल्या आपल्या मुलाला पाहण्याची संधी सुनीलला मिळाली नाही.
मात्र, पार्थिव आलेल्या दिवशीच सकाळी त्याला मुलगा झाल्याने मुलग्याच्या रूपाने सुनीलचा पुनर्जन्म झाल्याची चर्चा गावकरी व घटनास्थळी होती.

‘सुनील’ हे कोल्हापूरचे भूषण
देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणारे जवान सुनील हे कोल्हापूरचे भूषण आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून शासन सुनीलच्या कुटुंबीयांमागे राहील, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

लग्नाचा वाढदिवस राहिला अधुरा
२७ जानेवारी २००४ मध्ये सुनील व संध्या यांचा विवाह झाला होता. मात्र, काळाने सुनीलला हिरावून नेल्याने त्यांच्या लग्नाचा १५वा वाढदिवस अर्धवटच राहिला.


माता-पिता भाग्यवान
देशासाठी धारातीर्थी पडणारा सुपुत्र देणारे माता-पिता भाग्यवान आहेत, अशा शब्दांत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

डिजीटल फलक..
अन् हंबरडा..!
ग्रामस्थांनी केवळ सुनीलचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली होती. मात्र, आज पहाटे घराबाहेर लावलेल्या मुलाच्या श्रद्धांजलीचे डिजीटल फलक पाहून वडील शंकर यांना धक्का बसला अन् हंबरडा फोडला.


आरोग्य विभागाची सेवा
सुनीलची पत्नी संध्या यांना तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पतीच्या मृत्यूची बातमी कळू दिली नव्हती. गावामध्ये पार्थिव आल्यानंतर त्यांना रुग्णालयात या घटनेची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या खास रुग्णवाहिकेतून त्यांना अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आले. आक्रोश पाहून उपस्थितांची मने हळहळली.