शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : टोलमुक्त केले, विमानसेवा सुरू, आता आयटी पार्क आणू : अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 18:08 IST

आमच्या सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. भ्रष्टाचार कमी केला. ऊस उत्पादकांना थेट अनुदान दिले. विमानसेवा सुरू केली. आता आयटी पार्क आणून विकास करू, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले.  

ठळक मुद्देटोलमुक्त केले, विमानसेवा सुरू, आता आयटी पार्क आणू : अमित शहाकोल्हापुरात महायुतीच्या सभेत पवार यांच्यावर टीकेचा भडिमार

कोल्हापूर : ‘मोदी-फडणवीस की राहुलबाबा-शरद पवार यांच्यापैकी तुम्हांला कुणाची निवड करायची आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत नंबर १ चे राज्य करून दाखवू. आमच्या सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. भ्रष्टाचार कमी केला. ऊस उत्पादकांना थेट अनुदान दिले. विमानसेवा सुरू केली. आता आयटी पार्क आणून विकास करू, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले.  

ढगाळ हवामानामुळे विमानप्रवासात अडचणी आल्याने तब्बल दोन तास उशिराने येथील तपोवन मैदानावर रखरखत्या उन्हात ही सभा झाली.महापुरात कोल्हापूर-सांगलीचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करून ही दोन्ही शहरे आम्ही सुंदर बनवू, असे आश्वासनही शहा यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायांखालची वाळू घसरल्यामुळेच ते विचित्र हावभाव करीत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सभेत केली.शहा म्हणाले,विकासाची कामे काय होतील-राहतील; पण काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत ५६ इंच छातीवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखविली. हे कलम रद्द झाल्यानंतरची देशातील ही पहिलीच निवडणूक असल्याने महायुतीला विजयी करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून द्या.कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक व महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. आमदार अमल महाडिक यांनी स्वागत केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाkolhapurकोल्हापूरBJPभाजपा