शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

गदिमांच्या स्मारकासाठी साहित्यिकांनी उगारली शब्दांची अस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत आणि रसिकांतर्फे आगळेवेगळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत आणि रसिकांतर्फे आगळेवेगळे जनआंदोलन करण्यात येणार आहे. गदिमांच्या ४३ व्या स्मृतिदिनी १४ डिसेंबरला सांगलीत गदिमांच्या काव्यांचा जागर केला जाणार आहे. राज्यभरात, तसेच बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातील रसिकही त्यामध्ये सहभागी होतील.

गदिमा स्मारक जनआंदोलन समितीच्या प्राथमिक बैठकीत याचे नियोजन झाले. प्रा. भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर आणि अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली.

गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात स्मारक उभारण्याची घोषणा शासनाने केली होती. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याची शासनाला आठवण करून देण्यासाठी साहित्यिकांनी शब्दांचीच अस्त्रे उगारली आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात कोणत्याही घोषणाबाजीशिवाय व शासन किंवा राजकीय पक्षांचा निषेध टाळून आंदोलन केले जाईल. गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करून शासनाचे लक्ष वेधले जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेथील साहित्यिक हे अनोखे आंदोलन करतील. गोवा, भोपाळ आणि बंगलोर येथेही आंदोलन होईल. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंड, म्यानमार, नेदरलँड आणि इटली या देशांतील मराठी बांधवही आपापल्या परिसरात गदिमांच्या कविता व गीतांचा जागर करतील.

सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा

गदिमांचे मूळ गाव माडगूळ हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यात आहे. शेटफळे हे जन्मगावदेखील आटपाडी तालुक्यातच आहे. त्यामुळे देश-विदेशांतील या आंदोलनात सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.