शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीय झेंडा बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लढूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पक्षीय झेंडा बाजूला ठेवून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी ...

कोल्हापूर : पक्षीय झेंडा बाजूला ठेवून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. घाटगे यांनी शुक्रवारी (दि. २१) याबाबत जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि नेत्यांशी ऑनलाईन बैठकीत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

घाटगे म्हणाले, लवकरच मराठा आरक्षणासंबंधी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली जाईल. यावेळी पक्ष, गट-तट सर्व काही सोडून एक मराठा म्हणून आता सर्वांनी एकत्र येत हा लढा पुन्हा एकदा उभा करणे आवश्यक आहे. या लढ्याची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातूनच करण्याबद्दल मी आवाहन करतो. प्रत्येक मराठा युवक-युवतीने आता पुढाकार घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व केले पाहिजे. आता एक मराठा म्हणून हा विषय तडीस नेल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

या चर्चेत माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, मिलिंद भिडे, शिवाजी माने व इतर पदाधिकारी या चर्चेत सहभागी झाले होते.

२२०५२०२१ कोल समरजित घाटगे