शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जाखलेत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना जीवदान, दोन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:04 IST

नागरिकांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम केली फत्ते

वारणानगर : जाखले (ता.पन्हाळा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना सुमारे दोन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अखेर यश आले. शुक्रवारी सांयकाळपर्यंत थराराचा हा प्रसंग उशिरापर्यंत विहिरीवर सुरू होता.

जाखले येथील जामदार मळ्यातील शरद पाटील यांच्या विहिरीमध्ये बिबट्याची दोन पिल्ले पडल्याची घटना शारदा पाटील यांना आढळली. याची माहिती पोलिस पाटील अजित पाटील यांना कळविली. यानंतर, वनविभागाचे वनरक्षक योगेश पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची पिल्ले विहिरीत पडल्याची बातमी गावात पसरताच, नागरिकांनी विहिरीवर मोठी गर्दी केली. वनविभागाच्या आरआरटी या रेस्क्यू टीमला पाचारण केले.

सायंकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या पिल्लांना पकडण्यासाठी सापळा विहिरीत सोडला आणि रात्री उशिरापर्यंत पिल्लांना सापळ्याच्या साह्याने पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. विहिरीच्या काठावर झुडपे असल्याने कर्मचारी आणि नागरिकांनी स्वच्छता केल्यामुळे विहिरीत जाळी व पिंजरा सोडण्यास मदत झाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अखेर दोन तासांच्या अथक आणि थरारक प्रयत्नानंतर नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्लांना जाळीद्वारे पकडले. ही पिल्ली साधारणपणे अंदाजे आठ नऊ महिने वयाची असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी वनविभागाच्या आरआरटी पथक कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहा.वनसंरक्षक वन व कॅम्प कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्र अधिकारी अजित माळी, वनपाल सागर पटकरे, राक्षीचे वनरक्षक योगेश पाटील, प्रदीप सुतार, संतोष बिरंबोळे, आरआरटी टीम पन्हाळा व कोल्हापूर यांच्या पथकाने मोहीम फत्ते केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Leopard cubs rescued from well after thrilling two-hour operation.

Web Summary : Forest officials rescued two leopard cubs from a well in Jakale, Kolhapur, after a dramatic two-hour rescue operation. The cubs, around eight to nine months old, were safely captured with the help of villagers and forest department staff.