शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ

By सचिन यादव | Updated: March 28, 2025 15:34 IST

कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्त असताना ...

कोल्हापूर: कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्त असताना देखील कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हल्ला करणाऱ्या वकिलाला आवरल्याने मोठा अनर्थ टळला. ये पश्या.. म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरुन बाजुला केले.  दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरटकरच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली. त्यामुळे ३० मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीतच राहणार आहे. आज, शुक्रवारी चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सत्र एस. एस. तट यांच्यासमोर ही सुनावणी झाली. 

कोरटकर याचे बुकीमालकाचे संबध आहेत. त्याचा तीन राज्यात वावर होता, त्याला अजून कोणत्या संघटना, व्यक्ती मदत करत आहेत का, फरार काळात त्याने पाच ते सहा हॉटेलमध्ये मुक्काम, फिरण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर केला आहे, त्याचे आणखी कोणाशी हितसंबध आहेत का, याचा तपास होण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी ॲड. असीम सरोदे आणि सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केली.

वाचा - प्रशांत कोरटकर याने पसार काळात दोन वाहनांचा केला वापर, पोलिस चौकशीत समोर आली माहितीदरम्यान सुरक्षेच्या कारणासाठी कोरटकरला सकाळी आठ वाजता राजारामपुरी पोलिस कोठडीतून बाहेर काढले. त्या वेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. झटापटीत त्याचा शर्टही फाटला. दुपारी बारा नंतर न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केलेल्या युक्तिवादानुसार त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकर यांची बाजू मांडली. सुनावणीनंतर त्याला कोठडीकडे नेताना पोलिसांच्या गराड्यातच वकील अमितकुमार भोसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले ) याने ए हरामखोर परशा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तू आक्षेपार्ह बोलतोस, असे बोलत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुमारे पन्नासहून अधिक पोलिसांच्या उपस्थितीत त्याने हा प्रयत्न केल्याने पोलिस यंत्रणा पूर्णपणे हडबडून गेली. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याचे तोंड दाबले. त्याला न्यायालयाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कँन्टीनमध्ये थोडा वेळ थांबवून ताब्यात घेतले. या घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस