शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

लॅटव्हियन तरुणांचा ‘टुक टुक कार प्रवास’

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

भारतीय माहितीपटाची निर्मिती : देशभर दोन रिक्षा घेऊन आठजणांची भ्रमंती

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरखरं म्हणजे हे तरुण, तरुणी युरोप खंडातील पूर्व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील लॅटव्हिया देशातील; परंतु त्यांना साहसी पर्यटनाची जबरदस्त आवड. त्यांनी भारताबद्दलची माहिती घेतली आणि बॅगा भरून थेट दिल्ली गाठली. त्यांना भारतावर लघुपट तयार करायचाय. मग चक्क दोन रिक्षा घेऊनच त्यांचे भारत भ्रमण सुरू झाले. सध्या गोव्यात त्यांचे चित्रीकरण सुरू असून भारतीयांवर ही मंडळी जाम फिदा आहेत. एकीकडे जिल्ह्यात २१ फेबु्रवारीला जिल्हा परिषदेच्या मतदानाची झुंबड उडाली होती. त्यादिवशी निपाणीच्या पुढील तवंदी घाटात निळ्या रंगाच्या दोन रिक्षातून आलेले हे आठ विदेशी तरुण थांबले होते. कुतुहलाने त्यांची चौकशी केली असता एक भन्नाट कहाणी ऐकायला मिळाली. लॅटव्हिया या युरोप खंडातील छोट्याशा देशातून हे सर्वजण आलेत. त्यातील रॉबर्ट विटॉल्स हा लघुपट निर्माता. रेमंडस, लिनी, आर्टिस, एलिना, विल्नीस, सॅन्डीस, रेनर्स हे त्याचे सहकारी. दिल्लीपासून त्यांनी भारत फिरायला सुरुवात केलीय. उत्तम पर्यटन, धार्मिक, साहसीस्थळी जायचं. तिथलं चित्रीकरण करायचं. असा त्यांचा दिनक्रम आहे. त्यातील रेमंडस् हा आयटी कंपनीत मॅनेजर आहे आणि साहसी सहलींचेही आयोजन करतो. भारतातील मंदिरं, मोठे तलाव, समुद्रकिनारे, जंगलं सगळा प्रवास रिक्षातून. भारतीय नागरिकांच्या प्रेमानं ते भारावून गेलेत. रिक्षाला ही मंडळी ‘टुक टुक कार’ म्हणतात. ‘आर टुकटुकिम पा इंडिजू’ हे त्यांच्या लॅटेव्हियन भाषेतील या लघुपटाचे नाव आहे. भारतातील ‘टूक टूक कारमधील आमचा प्रवास’असेच काहीसे या लघुपटाचे स्वरूप राहणार आहे. ‘जस्ट अ फन’या सगळ्या प्रवासासाठी वातानुकूलित एखादी गाडी का घेतली नाही असं विचारल्यानंतर मात्र खांदे उडवत ‘जस्ट अ फन’ असं रॉबर्ट सांगतो. या सर्वांच्या अंगात किती खोडकरपणा आहे हे छायाचित्र घेतानाही दिसून आले. छायाचित्र घेतानाही सरळ उभं न राहता त्यांनी कशी पोझ दिलीय ते आपल्याला शेजारच्या छायाचित्रात पाहायला मिळेल.