शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Rain: कोल्हापुरात मुसळधार, महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेत NDRFची पथकं रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:39 IST

Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलंय.

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

कोल्हापूर: कोल्हापुरात(Kolhapur) मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊ सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आताही पावसाची परिस्थिती जैसे थेच आहे. जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफची दोन पथकं कोल्हापुरकडे रवाना झाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलंय. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात संततधार सुरू असून, राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलंय. यातच, पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी 35 फूट आहे.

जिल्ह्यातील अनेक रस्ते बंदजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. नीलजी आणि ऐनापूर हे दोन बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. तसेच, गडहिंग्लज-चंदगड राजमार्गावर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये, त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आलाय. मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर येल्लुर गावाजवळ 2 फूट पाणी आल्यानं प्रशासनानं महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एनडीआरएफची पथकं रवानामुसळधार पावसामुळे जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचं नियोजन होतं. पण, शासनाने आज पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर