शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 22:58 IST

धडक इतकी जोराची होती दोन्ही युवकांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली. डोक्याचा चेंदामेंदा झालेली स्थिती घटनास्थळी दिसत होती.

शाहूवाडी : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर खुटाळवाडी गावानजीक कोल्हापूरच्या दिशेने , बांबवडेकडे ऊस भरून जात असलेल्या ट्रकने पाठीमागून मोटरसायकलवरील दोन युवकांना धडक दिली. या अपघातात आंबर्डे तालुका शाहुवाडी येथील सैन्य भरतीसाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पारस आनंदा परीट (वय 19), सुरज ज्ञानदेव उंड्रीकर  (वय 20) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत. या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आंबर्डे येथील पारस परीट व सुरज उंड्रीकर हे दोन युवक कोल्हापूर येथे सैन्य भरतीसाठी शनिवार 15 नोव्हेंबर रोजी गेले होते. रविवार 16 नोव्हेंबर रोजी ते सायंकाळच्या दरम्यान आपल्या आंबर्डे गावी परत येत होते. यावेळी बांबवडे नजीक खुटाळवाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बांबवडेच्या दिशेने ऊस भरलेला ट्रक येत होता. या ट्रकची मोटरसायकलवर असलेल्या या दोन्ही युवकांना पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.

धडक इतकी जोराची होती दोन्ही युवकांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली. डोक्याचा चेंदामेंदा झालेली स्थिती घटनास्थळी दिसत होती. अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर ट्रक चालक पळून जात असता नागरिकांनी त्याला पकडले. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस व शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृत युवकांना मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Two youths killed in accident while returning from army recruitment.

Web Summary : Two youths returning from army recruitment died instantly near Khutalwadi. A speeding sugarcane truck hit their motorcycle. Paras Parit and Suraj Undrikar were identified as the deceased. Police are investigating the incident.
टॅग्स :Accidentअपघात