शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात महायुतीचा झेंडा, ३४ जागा जिंकणारा काँग्रेस सर्वांत मोठ पक्ष; सर्वांत तरुण नगरसेवक कोण..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:08 IST

कुणी मारली बाजी, कुणाला बसला पराभवाचा धक्का... जाणून घ्या

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर सर्वाधिक ४५ जागा जिंकून महायुतीने अखेर आपला झेंडा फडकविला. भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा तिघांनी एकत्र येऊन महायुती म्हणून ही निवडणूक लढविली, तरीही काँग्रेस पक्षाने त्यांना एकाकी कडवी झुंज देत ३४ जागांपर्यंत मजल मारली. महायुतीत सर्वाधिक २६ जागांवर भाजपने बाजी मारली असल्याने स्वाभाविकपणे त्यांच्याकडून महापौरपदावर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे भाजपचा महापौर होणे, ही कोल्हापूरच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल.

कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अतिशय चुरशीने लढली गेली. एका- एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच झाली. आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यातून महापालिका काढून घेणे तसे अवघड काम होते. त्यामुळे महायुतीने अतिशय सावधपणे व्यूहरचना आखून त्यांच्याशी दोन हात केले. वेगवेगळे लढल्यास यश मिळणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे महायुती करण्याचा तिन्ही पक्षांनी ठाम निर्धार केला होता, तसेच बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची यादीही अगदी शेवटच्या क्षणी जाहीर केली होती. उमेदवारी देण्यापासून ते मतदानापर्यंत अत्यंत सावध हालचाली करीत विजयापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.

शिवशाहू आघाडीचा दारुण पराभव

महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या आप, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी यांनी शिवशाहू आघाडी स्थापन करून आपल्या अस्तित्वाची लढाई स्वीकारली; परंतु त्यांचा दारुण पराभव झाला. एकही जागा त्यांना जिंकता आली नाही.

या माजी नगरसेवकांची बाजी

या निवडणुकीत दोन माजी महापौरांसह ४९ माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते. २३ जणांना याही निवडणुकीत विजय संपादन करता आला, तर २६ जणांना पराभवाला सामोरे जावे लागले. विजय मिळविलेल्यांमध्ये सुभाष बुचडे, अर्चना पागर, स्वाती यवलुजे, पल्लवी देसाई, अर्जुन माने, राजेश लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, अनुराधा खेडकर, इंद्रजीत बोंद्रे, संगीता सावंत, शारंगधर देशमुख, अर्चना कोराणे, जयश्री चव्हाण, माधुरी नकाते, आदिल फरास, नियाज खान, विनायक फाळके, प्रवीण केसरकर यांचा समावेश आहे.

या माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का

पराभूत झालेल्या माजी नगरसेवकांत भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रकाश पाटील, राहुल माने, राजू दिंडोर्ले, दिलीप पोवार, ईश्वर परमार, प्रकाश नाईकनवरे, स्मिता माने, संजय निकम, तेजस्विनी घोरपडे, नंदकुमार मोरे, उमा बनछोडे, पूजाश्री साळोखे, विजय साळोखे, दत्ताजी टिपुगडे, दीपा मगदूम, महेश सावंत, यशोदा मोहिते, शारदा देवणे, रमेश पुरेकर, प्रेमा डवरी, विलास वास्कर, पद्मावती पाटील, शोभा कवाळे, रशीद बारगीर यांचा समावेश आहे.

दोन माजी महापौर विजयी

एकदा महापौर झाल्यानंतर पुन्हा विजय मिळत नाही, असे मानले जात होते; परंतु माधवी गवंडी, स्वाती यवलुजे या दोन माजी महापौरांनीही बाजी मारली, तसेच माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती आश्कीन आजरेकर, माजी महापौर हसीना फरास यांचे सुपुत्र आदिल फरास, कांचन कवाळे यांचे सुपुत्र रोहित कवाळे हे विजयी झाले.

पती विजयी, पत्नीचा पराभव

काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांनी विजय मिळविला, तर त्यांच्या पत्नी मयूरी बोंद्रे यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी नगरसेवक राहुल माने यांचा पराभव होत असताना त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने यांनी विजय मिळविला. माजी उपमहापौर भूपाल शेटे व त्यांची कन्या पूजा शेटे या दोघांचाही पराभव झाला.

आमदार पुत्राचा दणकेबाज विजय

आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी दणकेबाज विजय हासील केला. त्यांचे प्रतिस्पर्धी हॉकीपट्टू विजय साळोखे सरदार यांनी प्रचारादरम्यान मोठी हवा केली होती. सोशल मीडियावरील प्रचाराने येथील लढतीची रंगत अधिकच वाढली होती. सरदार यांच्या हाती हॉकी स्टिक असतानादेखील शेवटी क्षीरसागर यांनीच विजयाचा ‘गोल’ मारला.

मुद्दे ठरले निर्णायक

१. गेल्या पाच वर्षांत महायुतीने आणलेला विकास निधी व केलेल्या विकासकामांची मतदारांसमोर केलेली वास्तव मांडणी.
२. राज्यात, देशात महायुतीचे सरकार असल्याने महापालिकेत सत्ता दिल्यास भविष्यात मोठा विकास निधी आणण्याचे दिलेले आश्वासन
३. इतकी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेस पक्षाने शहराचा कोणताही विकास केला नाही यावर प्रचारादरम्यान दिलेला जोर
४. काँग्रेस पक्षाकडे सत्ताच नसल्याने कोल्हापूरसाठी विकास निधी कोठून आणणार, या प्रचाराचा परिणाम झाला.
५. थेट पाइपलाइनमधील भ्रष्टाचाराचे झालेले आरोप, कोल्हापूरकरांवरील टोल रद्द केल्याची करून दिलेली आठवण

या प्रस्थापितांना बसला धक्का

- भूपाल शेटे - काँग्रेस प्रभाग क्रमांक १८ ड
- मधुकर रामाणे - काँग्रेस, प्रभाग क्रमांक १९ ड
- नंदकुमार मोरे - शिंदेसेना, प्रभाग क्रमांक ६ ड
- प्रकाश नाईकनवरे - शिंदेसेना, प्रभाग क्रमांक १४ क
- राजू दिंडोर्ले - काँग्रेस पुरस्कृत, प्रभाग क्रमांक २० ड

सर्वांत तरुण नगरसेवक

  • मानसी सतीश लोळगे (वय २३) प्रभाग १९ ब, राष्ट्रवादी (अजित पवार)
  • धनश्री महेश कोरवी (वय २२) प्रभाग १६ ब, काँग्रेस


सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक

  • सुभाष बुचडे (वय ६३), प्रभाग क्रमांक १ अ, काँग्रेस
  • रेखा उगवे (वय ६२), प्रभाग क्रमांक १३ ब, भाजप


तरुण तुर्कांचे सभागृह

महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतांशी नवनिर्वाचित नगरसेवक ४० वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे सभागृहात तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

पक्ष -- आत्ता मिळविलेल्या जागा -- गेल्या वेळी जागा -- वाढ/घट

  • काँग्रेस - ३४ -- ३० -- ०४
  • भाजप - २६ -- १४ -- १२
  • ताराराणी आघाडी -- ०० -- १९ -- ००
  • शिंदेसेना - १५ -- ०४ -- ११
  • राष्ट्रवादी - ०४ -- १४ -- १० -
  • उद्धवसेना -०१ -- ०० -- ०१
  • जनसुराज्य - ०१-- ०० -- ०१
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Mahayuti wins, Congress largest party, youngest corporators named.

Web Summary : Mahayuti won Kolhapur Municipal Corporation with 45 seats. Congress secured 34, becoming the largest single party. BJP won 26 seats. Manasi Lolge and Dhanashree Korvi are the youngest corporators.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीcongressकाँग्रेसBJPभाजपाMayorमहापौर