शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्हा बँकेत दाखल; सीईओ, व्यवस्थापकांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 1:10 PM

कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांच्या घोटाळा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान त्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत जात बँकेचे सीईओ डाँ. ए. बी माने, व्यवस्थापक आर. जे पाटील यांची भेट घेतली. या भेटीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.आमदार हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना (ब्राक्स) येथे घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने छापे टाकले होते. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. वातावरण शांतएकूणच ईडीने केलेली कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चीड आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोमय्या कोल्हापुरात येत असल्याने वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र मुश्रीफांनी केलेल्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्ये शांतता दिसून आली.सोमय्यांचे स्वागत, कार्यकर्त्यांनी शांतता राखावी - हसन मुश्रीफ  माजी खासदार किरीट सोमय्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार असल्याने या भेटीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. यापूर्वीच मी त्यांना आवाहन केले आहे की, तुम्ही बँकेत या आणि तुम्हाला जी-जी माहिती हवी असेल ती घ्या. कदाचित; त्यानुसार ते येत असावेत. असे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.बँकेच्या अधिकाऱ्यांची तब्बल ३० तास चौकशीकाही दिवसापुर्वीच ईडीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापेमारी करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून तब्बल ३० तास ‘ब्रिक्स’ व ‘ संताजी घोरपडे’ साखर कारखान्याशी संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKirit Somaiyaकिरीट सोमय्याbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ