शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबाची चैत्र यात्रा भाविकांविना सुनीसुनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

यात्रेच्या सोमवारी मुख्य दिवशी पहाटे पाच वाजता शासकीय महापूजा पन्हाळाचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाली. यात्रेनिमित्त दख्खनचा ...

यात्रेच्या सोमवारी मुख्य दिवशी पहाटे पाच वाजता शासकीय महापूजा पन्हाळाचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाली. यात्रेनिमित्त दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटातील सालंकृत महापूजा बांधण्यात आली. ही पूजा प्रवीण कापरे, कृष्णात दादर्णे, प्रकाश सांगळे यांनी बांधली.

दहा वाजता धुपारती सोहळा झाला

चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण, चाळीस फूट उंचीच्या सासनकाठ्या, रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या, काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविले जाणारे दृष्य, भर उन्हात गुलालात चिंब होऊन नाचणारा तरुण वर्ग ‘सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलऽऽचा अखंड गजर यंदाही पाहायला आणि ऐकायला मिळाला नाही. '

दुपारी १२ वाजता निघणाऱ्या सासनकाठीच्या मिरवणुका यंदाही निघाल्या नाहीत.

मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हलगी पिपाणीच्या तालावर या सासनकाठ्या भाविक नाचवीत असतात. सलग दुसऱ्या वर्षीही ही मिरवणूक झाली नाही. सासनकाठी मार्गावर शुकशुकाट होता. कडक बंदोबस्त ठेवला होता. जोतिबा गावातील सर्व गल्ल्या बंदिस्त ठेवल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून मोजक्याच पुजाऱ्यांसमवेत यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ झाली. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता झाली.

.............

गृहराज्यमंत्री देसाई यांनी घेतले दर्शन

दरम्यान, दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी श्री जोतिबाचे दर्शन मंदिराच्या बाहेरून घेतले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जोतिबा डोंगरावर आणि जोतिबा मंदिरात प्रवेश करण्यास मनाई केली होती. पश्चिम देवस्थान समितीमार्फत जोतिबा दर्शन पालखी सोहळ्याचे थेट प्रसारणासाठी ऑनलाईनची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली होती.

फोटो जोतिबा१,२,३

चैत्र पौर्णिमेनिमित्त दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची बांधण्यात आलेली राजेशाही थाटातील सालंकृत बैठी महापूजा.

२ ) कडक लॉकडाऊनमुळे मंदिर परिसर आणि सासनकाठी मार्गावर भाविकांविना शुकशुकाट असा दिसत होता.