शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणारच - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, या घोषणेपासून आघाडी सरकार बाजूला जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, या घोषणेपासून आघाडी सरकार बाजूला जाणार नाही. राज्याच्या प्रमुखांनी विधिमंडळात जाहीर केल्याने सभागृहाच्या रेकॉर्डवर आले आहे. राज्याची आर्थिक घडी मूळ पदावर आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान देणारच, असा पुनर्उच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काय बोलतो हेच कळत नाही. त्यांना विनाशकाली विपरीत बुद्धी सुचत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री पवार हे सोमवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात आले हाेते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लॉकडाऊनचा फटका बसलेल्या रिक्षाचालक, बांधकाम मजूर, घरेलू कामगार आदींना मदत दिली आहे. निर्बंधाचा त्रास होतो याची जाणीव आम्हालाही आहे, मात्र त्याशिवाय पर्याय नसून व्यापारी वर्गानेही आणखी थोडे सहकार्य करावे.

केंद्राने मदत करूनही आघाडी सरकार टीका करते, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विचारले असता, जीएसटीपोटी केंद्राकडून २४ हजार कोटी यायचे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने केंद्राला पत्र पाठवले आहे. चंद्रकांत पाटील दुर्दैवाने मंत्रिमंडळात नसल्याने त्यांना आकडे माहीत नाहीत. आम्ही सरकारमध्ये आहे, आम्हाला सहीचा अधिकार असल्याने सर्व गोष्टी आम्ही बघतो. काही लोकांना आपण काय बोलतो, हेच कळत नाही.

शाहू छत्रपती यांच्याकडे चहाच्या निमित्ताने गेल्याने तिथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, सगळ्या घटकांचे प्रश्न सुटले पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळण्यासाठी मार्ग काढला पाहिजे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बारा मागण्या केल्या. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आरक्षणाचा विषय होता. केंद्राने आरक्षणाबाबत संसदेत बिल आणून मंजूर करावे व कायदा केल्यानंतर हा प्रश्न संपेल. याबाबत अहमदाबाद न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल दिला असून, त्यानुसार पुढील पाऊले उचलली जातील. जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे रुग्ण वाढल्याने आषाढी वारीला परवानगी दिलेली नाही. याबाबत वारकऱ्यांशी चर्चा झाली असून कोरोना नसता तर वारीमध्ये आम्ही पुढे असतो, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार

नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत विचारले असता, मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपला पक्ष वाढीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो, त्यात गैर काय? असेही अजित पवार यांनी सांगितले.

कोल्हापूरसाठी १० टक्के जादा लस

लोकसंख्येच्या तुलनेत लस दिली जाते. मात्र, जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे, तिथे ५ ते १० टक्के जादा लस देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात सोमवारी दिव्यांगांना लसीकरण

कोल्हापूर शहरात दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने केले जात आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक सोमवारी त्यांच्या गावात जाऊन लसीकरण देण्याच्या सूचना दिल्याचे पवार यांनी सांगितले.

आशा वर्कर्स, सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावू

आशा वर्कर्स युनियनच्या प्रमुखांशी आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे. सफाई कामगारांबाबत येत्या अधिवेशनात पुरवणी मागणीत मंजुरी घेऊन त्यांचाही प्रश्न मार्गी लावू, असे पवार यांनी सांगितले.

...तर निर्बंध अधिक कडक

कोल्हापुरात सकाळी प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या तोंडाला मास्क दिसले नाहीत, कोण पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने खिशातील रुमाल बांधून वेळ मारून नेतो, ही बाब गंभीर आहे. जर नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली नाहीतर निर्बंध अधिक कडक करावे लागतील, असा इशारा पवार यांनी दिला.

‘एमपीडब्ल्यू’चा निकाल दोन दिवसांत

‘एमपीडब्ल्यू’बाबत औरंगाबाद, जळगाव, जालना येथे पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरू असल्याने हे जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्याचा निकाल दोन दिवसांत जाहीर केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.