इचलकरंजीत वास्तू:शांती कार्यक्रमात विजेचा धक्का लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 21:58 IST2026-05-13T21:58:31+5:302026-05-13T21:58:51+5:30

याबाबत इकबाल मियालाल मुजावर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.

in ichalkaranji vastu shanti program a 10 year old boy dies after getting electric shock | इचलकरंजीत वास्तू:शांती कार्यक्रमात विजेचा धक्का लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

इचलकरंजीत वास्तू:शांती कार्यक्रमात विजेचा धक्का लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : येथील एका नातेवाइकाकडे वास्तू:शांतीसाठी आलेल्या चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विहान शहाबाज शेख (वय १०, रा. शाहूनगर, कागल) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरात घडली. या घटनेमुळे कार्यक्रमावर शोककळा पसरली. याबाबत इकबाल मियालाल मुजावर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विहान हा त्याची आई फरीदा शहाबाज शेख आणि आजोबा इकबाल व आजी रमिजा यांच्यासोबत इचलकरंजीतील गुलाब पटेल यांच्या वास्तू:शांती कार्यक्रमासाठी आला होता. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाच्या ठिकाणी विहान हा पाणी पिण्यासाठी फॅनजवळ गेला. पाणी घेताना तेथे फॅनला जोडलेल्या सॉकेटला त्याचा पाय लागला. त्यामुळे त्याला विजेचा धक्का बसल्याने तो ओरडून खाली कोसळला.

घटनेनंतर नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रुग्णालय परिसरात नातेवाइक आणि मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती.

Web Title : इचलकरंजी: गृहप्रवेश कार्यक्रम में बिजली के झटके से बच्चे की मौत

Web Summary : इचलकरंजी में एक गृहप्रवेश कार्यक्रम में बिजली के झटके लगने से 10 वर्षीय बच्चे की मौत हो गई। कागल के विहान शेख अपने परिवार के साथ वहां गया था। पानी लेते समय उसने एक खराब पंखे के सॉकेट को छू लिया और गिर गया। उसे अस्पताल में मृत घोषित कर दिया गया।

Web Title : Ichalkaranji: Boy Dies of Electric Shock at Housewarming Ceremony

Web Summary : A 10-year-old boy died in Ichalkaranji after receiving an electric shock at a housewarming ceremony. Vihan Shaikh, from Kagal, was there with his family. He touched a faulty fan socket while getting water and collapsed. He was declared dead at the hospital.

टॅग्स :Accidentअपघात