शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत खून झाला स्वस्त? किरकोळ कारणावरून पडताहेत मुडदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:23 IST

शहर परिसरात विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही असतानाही गंभीर गुन्हे ...

शहर परिसरात विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही असतानाही गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे सलग चार महिन्यांत खुनाच्या आठ घटना घडल्या. कबनूर (ता. हातकणंगले) येथे राजकीय वादातून संदीप मागाडे, शहापूर येथे शुभम कुडाळकर, एका ३५ वर्षीय तरुणाचा खून करून शहापूर खणीत टाकण्यात आले. त्याचा अद्याप मागमूस नाही. त्यापाठोपाठ कोरोची माळावर व शांतीनगर परिसरात झालेले दोन्ही खून तरुणांचेच. विशेष म्हणजे या सर्व खून प्रकरणांत गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सर्व जण ऐन उमेदीतीतले तरुणच आहेत.

या घटनांकडे गांभीर्याने पाहिल्यास खुनशी स्टेटस्‌ ठेवणे, चैनी, नशा अशा प्रमुख कारणांतून खून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणाई भरकटत आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. शहरातील अनेक मातब्बर गुन्हेगार मोक्कांतर्गत कारागृहात आहेत. त्यामुळे खुनाचा बदला घेण्यासाठी खून, खंडणीसाठी खून, असे प्रकार थांबले असले तरी किरकोळ तात्त्विक कारणातून सहजपणे खून केले जातात.

शांतीनगर येथील अजित कांबळे याचा खून दारू पिण्यासाठी व चैनीसाठीच्या किरकोळ पैशांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे, तर खोतवाडी येथील खूनही सायकलचोरीच्या संशयावरून झाला. गतवर्षी कोरोची (ता. हातकणंगले) येथे दारू पिताना वाद होऊन खून झाला. त्यात आईने दारुड्या मुलाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केला. क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत मानसिकता पोहोचत आहे. ही खेदजनक व चिंताजनक बाब आहे.

चौकट

नूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे; परंतु खुनासारख्या गंभीर घटना थांबता थांबेनात. त्यातच घरात घुसून वृद्धेला लुबाडणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, नशेचे पदार्थ विक्री, गुटखा विक्री, असे अनेक गैरप्रकार वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.