शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात घर खरेदी वाढली, मुद्रांकला किती कोटींची कमाई झाली.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:09 IST

नऊ महिन्यात तब्बल ७३ हजार दस्त

कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात काेल्हापूर व इचलकरंजी या दोन शहरी भागात घर, फ्लॅट खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्या पाठोपाठ जमीन, शेती या जंगम मालमत्तांची मोठी प्रमाणात खरेदी-विक्री केली जात आहे. शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुद्रांक कार्यालयाला गेल्या नऊ महिन्यात ७३ हजार १८५ दस्त नोंदणीमधून ४०३ कोटींचे घसघशीत महसूल मिळाला आहे.

जमीनजुमला, घर खरेदी-विक्री, कर्ज व्यवहार, व्यावसायिक करारांमुळे दस्त नोंदणीत सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. यातून चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात शहरी भागातील मालमत्तांची खरेदी विक्री झाली आहे. जिल्ह्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी ही दोन मोठी शहरे असून याठिकाणी घर, फ्लॅट या रहिवासी मिळकतींची सर्वाधीक खरेदी-विक्री केली जाते. त्या पाठोपाठ शेतजमीन, अन्य जमिनींचे व्यवहार होतात असा मुद्रांक विभागाचा अनुभव आहे.

६७० कोटींचे उद्दिष्टय

काेल्हापूर जिल्ह्यातील मुद्रांक विभागाला चालु आर्थिक वर्षात ६७० कोटींचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. यापैकी मागील ९ महिन्यात ४०३ . ८७ कोटींचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. म्हणजे नऊ महिन्यात मुद्रांक विभागाच्याला एकूण उद्दिष्टाच्या ६० टक्के उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्याची रक्कम अजून समजलेली नाही. मात्र आर्थिक वर्ष अखेर म्हणजे ३१ मार्चपर्यंत साधारण ५५० कोटींपर्यंतचा उत्पन्नाचा टप्पा गाठला जाईल.

वर्षाला १ लाख दस्त

कोल्हापुरात मुद्रांक विभागाचे एकूण १८ कार्यालये आहेत. त्यापैकी सर्वात जास्त ४ कार्यालये करवीरमध्ये आहे. या सर्व कार्यालयांमध्ये मिळून वर्षाला साधारण ९७ हजार ते १ लाखांपर्यंतची दस्त नोंदणी होते.

दस्त नोंदणीत महिलांसाठी १ टक्का शुल्क माफ आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना आहे. दरवर्षी १ एप्रिलला रेडिरेकनरच्या दरात वाढ होत असते. तत्पूर्वी नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेत दस्त नोंदणी करून घ्यावी. - बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक, जिल्हाधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Sees Rise in Home Sales, Crores Earned in Stamp Duty

Web Summary : Kolhapur and Ichalkaranji witnessed increased property purchases in the last nine months. Stamp duty registrations generated ₹403 crore revenue for the district. The department aims to reach ₹550 crore by the financial year's end, boosted by schemes like women's 1% fee waiver.