लग्नाचे आमिष दाखवून एकीसोबत शारीरिक संबंध ठेवले, अन् दुसरीसोबतच केला विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:34 PM2023-02-25T12:34:56+5:302023-02-25T12:35:39+5:30
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नैराश्यातून पीडित युवतीने केला आत्महत्येचा प्रयत्न
![He had physical relations with one and got married with another | लग्नाचे आमिष दाखवून एकीसोबत शारीरिक संबंध ठेवले, अन् दुसरीसोबतच केला विवाह He had physical relations with one and got married with another | लग्नाचे आमिष दाखवून एकीसोबत शारीरिक संबंध ठेवले, अन् दुसरीसोबतच केला विवाह](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/pethvadgav_202302970191.jpg)
लग्नाचे आमिष दाखवून एकीसोबत शारीरिक संबंध ठेवले, अन् दुसरीसोबतच केला विवाह
पेठवडगाव : लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका युवकाविरोधात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. गेली अडीच वर्षे हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून रितेश प्रशांत पाटील (वय २२, रा. किणी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार किणी येथील रितेश पाटील याची पन्हाळा तालुक्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीबरोबर पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यातून त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिला वाठार येथील एका हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतर रितेश याने अन्य एका युवतीबरोबर विवाह केला.
त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नैराश्यातून पीडित युवतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाइकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शुक्रवारी युवतीने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैंजणे, हवालदार पतंगराव रेणुसे करीत आहेत.