अंबाबाई मंदिरातील योगिनींच्या शिल्पाखाली हळेकानडी शिलालेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:01 IST2026-04-18T14:00:49+5:302026-04-18T14:01:06+5:30
एपिग्राफिकल सोसायटीशी पत्रव्यवहार : वाचन करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार

अंबाबाई मंदिरातील योगिनींच्या शिल्पाखाली हळेकानडी शिलालेख
इंदुमती गणेश
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे जतन संवर्धन करताना ६४ योगिनींपैकी काही योगिनींच्या शिल्पाखाली हळेकानडी, तसेच देवनागरी भाषेतील शिलालेख (अभिलेख) आढळले आहेत. हळेकानही ही भाषा आता कुणाला येत नाही, त्यामुळे हा मजकूर काय आहे ते वाचून त्याचा अर्थ समजून देण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने एपिग्राफिकल सोसायटी ऑफ म्हैसूर यांना पत्र लिहून तज्ज्ञांना पाचारण करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मंदिराच्या १४५० कोटींच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यात अंतर्गत परिसराच्या जतन संवर्धनाचे काम सुरु आहे. मंदिराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम आहे. यावर सुंदर कोरीव शिल्प व नक्षीकाम आहे. त्यातील ६४ योगिनींचे शिल्प है या बांधकामाचे वैशिष्टच आहे. या दगडी बांधकामाच्या जतन व संवर्धनासाठी सॅन्ड ब्लास्टिंगची पद्धत वापरण्यात येत आहे. ब्लास्टिंगनंतर दगडांवर ऊन-पावसाचा परिणाम, पेंट, लेप है निघून मूळ दगडांचे सौंदर्य खुलले आहे. नव्या दगडांत मंदिर बांधले वाटावे असा त्याचा परिणाम आहे. हे काम झाल्यानंतर शिलालेख आढळले.
सातव्या ते नवव्या शतकातील लेख..!
अंबाबाई मंदिराचे बांधकाम हे वेगवेगळ्या राजवटीच्या काळात झाले आहे. त्यामुळे मंदिरावर त्या राजवटीमधील कलाकुसरीची छाप आहे. मूर्तीखालील लेख सातव्या ते नवव्या शतकातील चालुक्यांच्या काळातील असावेत.
हळेकानडी लिपीतील या शिलालेखात काय लिहिले हे समजत नाही; पण अभ्यासक आणि पुरातत्त्व खात्याच्या मतानुसार ही योगिनींची नावे असावीत किंवा मंदिरासाठी दान दिलेल्या राजांची, देणगीदारांची किवा या कलाकृती घडविलेल्या कलाकारांची (शिल्पी) नावे असावीत, असा अंदाज आहे.
काही जाणकारांच्या मते, पूर्वी या लेखांचे वाचन झाले आहे. या लेखांना शिलालेख, अभिलेख किंवा शिलापट्ट असेही
हलेकानडी लिपीतील शिलालेख फार कमी ठिकाणी आढळतात. अंबाबाई मंदिराच्या दगडी बांधकामावरील योगिर्नीच्या मूर्तीखाली आढळलेल्या शिलालेखांचे वाचन करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. जतन संवर्धनांतर्गत पुढील दीड वर्षात मंदिराचा कायापालट होणार आहे. शिवाय बांधकाम अधिक मजबूत होईल- विलास वहाणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग